Friday, April 24

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL
नांदेड, धार्मिक

Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील मुर्त्यांची शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरातील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिराच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्तिक शु.१४ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी कार्तिक स्वामी दर्शन घेत येणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा रात्री १० ते ०२ यावेळेत आला असल्याची माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. हिमायतनगर शहर हे देवी - देवतांच्या मुर्त्यांचे शहर म्हणून सबंध महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. हजारो वर्षापूर्वीच्या अखंड पाषाणातील दुर्मिळ मुर्त्या खोदकाम तथा बांधकामाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक मूर्ती म्हणजे (षडानंद...
OBC leader Laxman Hake : हिमायतनगर शहरात 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा होणार -NNL
नांदेड, राजकीय

OBC leader Laxman Hake : हिमायतनगर शहरात 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा होणार -NNL

हिमायतनगर| येणाऱ्या 18 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरात भव्य रँली व श्री परमेश्वर मंदीर मैदानातील बसस्टँड येथे विजय संकल्प महासभा होणार आहे. या सभेला ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचा मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे तमाम वंचित व ओबीसी समाज बांधवानी विजय संकल्प महासभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. हदगाव / हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील तमाम ओबीसी बहुजन बांधवांनी आलेल्या संधीचे सोने करून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा ओबीसी नेते दिलीप राठोड याना निवडून द्यावे. असे आवाहन प्रचाराच्या माध्यमातून मतदार संघात केले जात आहे. वंचित प्रचाराला गावागावातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विरोधकांकडून वंचितच्या उमेदवाराचा अपप्रचार करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचून ओबीसी व वंचित समाजाचे मतदान मि...
Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL
नांदेड, राजकीय

Public support of Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरातील असंख्य मुस्लिम बांधवांचा बाबुराव कदम कोहळीकर यांना जाहीर पाठिंबा -NNL

हिमायतनगर| हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार सांघट येणाऱ्या हिमायतनगर येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान निर्मिती कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने याबाबत याचिका दाखल केली आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार यांच्या कार्य शैलीवर नाराज होऊन हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गन्नी यांच्यासह पाच नगरसेवक व काँगेसच्या असंख्य शहराध्यक्ष फेरोज कुरेशी सह अनेक मुस्लिम बांधवांनी पोलीस ठाणे नजीक बाजार चौकात कार्यक्रम घेऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर याना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे. काँग्रेस पक्षाची एकगट्ठा मतदान असलेल्या हिमायतनगर शहरातील असंख्य मुस्लिम समाज बांधवानी आज पर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या मित्र पक्षालाच मतदान करून निवडून दिले आहे. मात्र मुस्लिम समाजाला न्याय देण्याचे स...
Show voting ink and get 30% discount : मतदानाची शाई दाखवा आणि वैद्यकीय तपासणीत ३०% सुट मिळवा नांदेड़ नीमा संघटनेचा एक अनोखा उपक्रम -NNL
नांदेड, लाइफस्टाइल

Show voting ink and get 30% discount : मतदानाची शाई दाखवा आणि वैद्यकीय तपासणीत ३०% सुट मिळवा नांदेड़ नीमा संघटनेचा एक अनोखा उपक्रम -NNL

नांदेड़| येत्या लोकसभा पोटनिवडणूक व सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्भूमीवर मतदानात जास्तीत जास्त लोक सहभाग वाढवण्यासाठी या भावनेतून आणि लोकांच्या आरोग्यासोबत लोकशाहीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राहण्यासाठी नांदेड निमा शाखेतर्फे एक अनोखा उपक्रम राबविन्यात आला यावेळीजिल्हाधिकारी, नावामनपचे आयुक्त व उपायुक्त गिरीश कदम यांना निवेदन देण्यात आले दिनांक २० नोव्हेंबर २०२४ या एका दिवसासाठी ज्या लोकांनी मतदान केले आहे आणि यांच्या बोटाला मतदान केले शाही असेल त्यांना नीमा संघटनेच्या सर्व प्रायव्हेट रुग्णालयात बाह्य विभाग ओपीडी मध्ये 30 टक्के सवलत दिल्या जाईल.असे नवीन निमा जिल्हा कार्यकारणी द्वारे जाहिर करण्यात आले आहे. नागरिकानी जास्तीजास्त मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आव्हान निमा या वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या निमा म्हणजेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने आव्हान केले आहे. आपली...
Nanded South Assembly : नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात 312 मतदान केंद्रावर 3लाख‌ 15हजार 248 मतदार मतदान हक्क बजावणार -NNL
नांदेड, लाइफस्टाइल

Nanded South Assembly : नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात 312 मतदान केंद्रावर 3लाख‌ 15हजार 248 मतदार मतदान हक्क बजावणार -NNL

नवीन नांदेड| नांदेड‌ लोकसभा पोटनिवडणुक साठी व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक साठी 312 मतदान‌ केंद्रावर 3 लाख 15 हजार 248 मतदार मतदानाचा हक्क 20 नोव्हेंबर रोजी बजावणार आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व‌ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील 312मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, यात पुरुष मतदार 1लाख‌61,हजार 130तर महिला मतदार 1लाख 54हजार 113 व तृतीय पंथी 5 व सैनिक 231,अशा 3लाख 15हजार 248 मतदाराचा समावेश आहे. नांदेड दक्षिण डॉ.सचिन खल्लाळ निवडणूक अधिकारी म्हणून हे काम पहात असुन पर्यवेक्षक,बिएओ मार्फत मतदारांना पोलचिट वाटप‌ करण्यात येत आहेत, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 126 व ऊतर विधानसभेचे 15 मतदान केंद्र असुन तिन‌ ठिकाणी चेक पोस्ट तपासणी नाके उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्य...
Selfie Point : मि मतदान करणार.. सेल्फी पाईंट‌ला प्रतिसाद -NNL
नांदेड, सोशल वर्क

Selfie Point : मि मतदान करणार.. सेल्फी पाईंट‌ला प्रतिसाद -NNL

नवीन नांदेड| जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड,व नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या वतीने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेल्फी पाईंट‌चे उद्घाटन सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड सेंटर येथे जेष्ठ नागरिक आनंदराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निवडणूक होत असुन जिल्हा प्रशासनाने ‌व नावा मनपाच्या सहाय्याने आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे सेल्फी पाईंट‌ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदान‌ टक्केवारी वाढविण्या साठी मि मतदान करणार, सेल्फी पाईंट‌चे उद्घाटन जेष्ठ नागरिक आनंदराव गायकवाड, यांच्...
Rahul Gandhi : आज राहुल गांधी यांची नांदेडच्या नवा मोंढा येथे सभा..! – NNL
नांदेड, राजकीय

Rahul Gandhi : आज राहुल गांधी यांची नांदेडच्या नवा मोंढा येथे सभा..! – NNL

नांदेड, अनिल मादसवार| जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले. पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शब्बीर अली हे बोलत होते. त्यांच्या सोबत तेलंगणातील जहीराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेशकुमार शेटकार, अखील भारतीय कांग्रेस कमिटीच्या सचिव झरीता, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश सचिव ऍड. घोडजकर, एकनाथ मोरे, बापु पाटील आणि मुन्तजिब यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना शब्बीर अली ...
Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL
नांदेड, राजकीय

Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशउपाध्यक्ष मा. भास्करराव काका काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते व आम्ही जरांगे चित्रपटाचे निर्माते तसेच प्रतिथयश दंतरोग तज्ञ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगाव येथे प्रवेश केला आहे . डॉ. दत्ता मोरे यांनी शेतकरी आणि सामाजिक चळवळीत कार्य केले..किसान ब्रिगेड चा मराठवाडा विभागीय अध्यक्ष, शेतकरी शेतमजूर पंचायत युवाप्रमुख च्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांच्या प्रश्नावर विविध आंदोलने करून आवाज उठवला.तसेच वैद्यकीय क्षेत्रात योगदान देत असतांना ज्वलंत झालेला मराठा आरक्षणाचा प्रश्न जगापुढे मांडण्यासाठी " आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा " या चित्रपटाची निर्मिती केली. यात माझे मित्र व चळवळीतील अनेक सहकार्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले...
Formar Mp Subhash Wankhede ; हिमायतनगरात गुरुवारी धडाडणार मा. खा. सुभाष वानखेडे यांची तोफ; बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी सभा – NNL
नांदेड, राजकीय

Formar Mp Subhash Wankhede ; हिमायतनगरात गुरुवारी धडाडणार मा. खा. सुभाष वानखेडे यांची तोफ; बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी सभा – NNL

हिमायतनगर। महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीचे मा. खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. 14 सायंकाळी ०६ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने उमेदवाराकडून प्रचार सभांचे आयोजन करून जनतेला जाहीरनाम्यात मांडण्यात आलेले मुद्दे सांगून मतदान रुपी आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाची एकही सभा हिमायतनगर शहरात झाली नाही. तर महायुतीची हिमायतनगर शहरात यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आत्ता हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची गुरुवारी जाहीर सभा होणार आहे. या सभेला श...
Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL
मुंबई, राजकीय

Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

अकोला/मुंबई| नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावे...
error: Content is protected !!