Wednesday, May 13

तेलंगणा

A creative collection of intelligent, highly defined and functional skincare. Products are rich in natural actives …

Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील विकासकामांवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना मूलभूत सुविधांचा अभाव

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातील रेल्वे स्थानकावर कोट्यावधीच्या निधीतून सुरु असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक त्रुटींमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकावरील दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर अद्याप रेल्वे कोच पोझिशन दर्शविणारे डिजिटल डिस्प्ले बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोणती गाडी कोणत्या ठिकाणी थांबणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एक नंबर प्लॅटफॉर्मवर जुन्या बांधकामाला नवीन स्वरूप देण्यात आल्याचे दिसून येते, तर दुरुस्तीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार आहे. छतामधून पाणी गळत असल्याचेही ...
Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

Rayalaseema Express : रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड/हिंगोली| नांदेड परिसरातील बालाजी भक्तांना थेट तिरुपतीला जाण्यासाठी सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देत ही मागणी लावून धरली आहे. सध्या नांदेड–तिरुपती प्रवासासाठी थेट रेल्वेची सुविधा मर्यादित असल्याने भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक दरवर्षी तिरुपतीला जातात. मात्र, थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार केल्यास या भागातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच व्यापारी व सर्वसामान्य प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. स्थानिक नागरिक...
Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगाडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगाडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धार्मिक, तेलंगणा, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तीर्थक्षेत्र बोरगडीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर बोरगडीच्या नावाची भव्य कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात येत असून, या पवित्र स्थळाची ओळख अधिक ठळक करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाईल. तसेच बोरगडीला ‘गट ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी आवश्यक ती सर्व पाठपुरावा करून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले की, “मारोतीरायांच्या आशीर्वादाने बोरगडी हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र म्हणून अधिक विकसित व्हावे, हीच आमची भूमिका असून भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळातही ठोस पावले उचलली जातील असे अभिवचन त्यांनी दिले..” चैत्र शुद्ध नवमी दि.०२ एप्रिल रोजी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक- मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्...
DRM Nanded inspects : डीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा

DRM Nanded inspects : डीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा

नांदेड, तेलंगणा, परभणी, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) श्री. कल्याण राजू यांनी विविध रेल्वे स्थानकांची पाहणी करत सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान कार्यक्षमता, सुरक्षा मानके आणि प्रवासी सुविधांवर विशेष भर देण्यात आला. दौऱ्यादरम्यान नागरसोल ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर रियर विंडो निरीक्षण करून सुरू असलेल्या दुहेरीकरण (Doubling) कामांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मार्गाची क्षमता वाढून गाड्यांची वेळपालनता सुधारण्यासोबतच प्रवासी आणि मालवाहतुकीला मोठी गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागरसोल, रोटेगाव, परतूर, सेलू आणि मानवत रोड या स्थानकांची अमृत भारत स्टेशन योजना (ABS) अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. या वेळी स्थानकांवरील प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यव...
Shri Ram Katha : पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्रीराम कथा’ व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञास उत्साहात प्रारंभ

Shri Ram Katha : पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्रीराम कथा’ व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञास उत्साहात प्रारंभ

धार्मिक, तेलंगणा, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या मौजे पिंपळगाव येथील दत्त संस्थानमध्ये दिनांक २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान आयोजित भव्य ‘श्रीराम कथा’, १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याला भव्य शोभायात्रेने जय श्रीराम जय हनुमान.. नामाच्या  जयघोषात सुरुवात झाली आहे. परमपूज्य गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या धार्मिक सत्संग सोहळ्यात प्रसिद्ध कथावाचक प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या ओजस्वी वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण केले जात आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्री दत्त संस्थान येथून टाळ-मृदंग, ढोल-ताशे, घोडे व बैलगाड्यांसह साधू-संतांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच शालेय विद्या...
Telangana Police Action : धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर तेलंगणा पोलिसांची धडक कारवाई

Telangana Police Action : धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर तेलंगणा पोलिसांची धडक कारवाई

क्राईम, तेलंगणा, नांदेड
धर्माबाद/म्हैसा| धर्माबाद परिसरातून तेलंगणा राज्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर तेलंगणा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन लॉरी, एक हायवा, एक जेसीबी आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. निर्मल जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक साई किरण यांनी भैन्सा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निर्मल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक जानकी शर्मिला यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व साठवणुकी विरोधात कठोर कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी बासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी धर्माबाद भागातून बासर व निजामाबादच्या दिशेने अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित वाहने ...
Thift Arested : महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरी; मरखेल पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Thift Arested : महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरी; मरखेल पोलिसांकडून आरोपी जेरबंद

क्राईम, तेलंगणा, नांदेड
देगलूर/नांदेड| देगलूर तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडून पैसे चोरणाऱ्या आरोपीला मरखेल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ मार्च ते ७ मार्च २०२६ दरम्यान माळेगाव (मक्ता) येथील महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तीने दानपेटी फोडून त्यातील अंदाजे सात हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रवि संग्रामअप्पा मदपती (वय २२) यांनी मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४२/२०२६ अंतर्गत भादंवि कलम ३३४(१) व ३०५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार राजू पि. किशन शिवरे (वय ३०, रा. कतलवाडी, मंडळ जुक्कल, जिल्हा कामारेड्डी, राज्य तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने ...
Railway Safety Prepared : उन्हाळ्यापूर्वी रेल्वे सुरक्षा सज्ज; नांदेड विभागात अभियांत्रिकी विभागाचा वार्षिक सुरक्षा परिसंवाद

Railway Safety Prepared : उन्हाळ्यापूर्वी रेल्वे सुरक्षा सज्ज; नांदेड विभागात अभियांत्रिकी विभागाचा वार्षिक सुरक्षा परिसंवाद

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अभियांत्रिकी विभागाकडून विभागीय मुख्यालयात वार्षिक सुरक्षा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात रेल्वे ट्रॅकची देखभाल, उन्हाळ्यातील संभाव्य धोके आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला गॅंगमेट्स, पीडब्ल्यूआय (Permanent Way Inspectors), एडीईएन (Assistant Divisional Engineers) यांच्यासह वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) नारायण प्रसाद श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय अभियंता/पश्चिम एन. सतीश, विभागीय अभियंता/ईशान्य अपूर्व वशिष्ठ तसेच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) कल्याण राजू यांची उपस्थिती होती. परिसंवादात उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे रेल्वे रुळांमध्ये होणारे प्रसरण, कोरड्या हव...
Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय

नांदेड, तेलंगणा, धार्मिक
नांदेड | तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील अत्तापुर परिसरातील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथील माननीय पंज प्यारे साहिबान यांनी स्पष्ट केले आहे. १५ मार्च २०२६ रोजी अत्तापुर, हैदराबाद येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या सुमारे १.५ एकर जमिनीवर प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. संबंधित जमीन गुरुद्वारा साहिबची असल्याचा दावा करण्यात येत असून या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाचा निकाल गुरुद्वारा साहिबच्या बाजूने लागल्यानंतर काही स्थानिकांनी ही जमीन मंदिराची असल्याची तक्रार प्रशासनाकडे केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत १.५ एकर जमिनीतून सुमारे १००० गज जमीन गुरुद्वारा साहिबकडे ठेवून उर्वरित जमिनीवर जप्तीची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई...
Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, तेलंगणा, देश विदेश, धार्मिक, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार | ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर सत्य, धर्म, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी होते. त्यांच्या बलिदानातून प्रत्येक पिढीला निर्भीडपणे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा वारसा राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या भव्य समागमास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अतुल ...
error: Content is protected !!