Thursday, June 25

यवतमाळ

Modern technology has become a total phenomenon for civilization, the defining force of a new social order in which efficiency is no longer an option but a necessity imposed on all human activity.

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

नांदेड, कृषी, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, यवतमाळ, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी...
Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

महाराष्ट्र, नांदेड, पुणे, मराठवाडा, मुंबई, यवतमाळ, लातूर, विदर्भ
मुंबई, प्रतिनिधी| महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि प्रशासकीय कामांचा वाढता ताण लक्षात घेता, राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवीन जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन अधिक गतिमान करणे, नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.  नवीन जिल्ह्यांची गरज का भासते? महाराष्ट्रातील काही जिल्हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या टोकाच्या भागातून मुख्यालय गाठण्यासाठी नागरिकांना ८ ते १० तासांचा...
Former Chief Minister Ashokrao Chavan : हिमायतनगरात भाजपची शक्तीप्रदर्शन सभा; डॉ. वानखेडे यांना द्या सेवेची संधी – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Former Chief Minister Ashokrao Chavan : हिमायतनगरात भाजपची शक्तीप्रदर्शन सभा; डॉ. वानखेडे यांना द्या सेवेची संधी – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड, यवतमाळ, व्हिडीओ
“कमळ दाबा… विकास माझी जबाबदारी!” माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा दमदार संदेश डॉ. वानखेडेंनी लोकांचे प्राण वाचवले… आता शहर वाचवणार! ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी, निधीची चिंता नाही चव्हाणांचे आश्वासन हिमायतनगर, अनिल मादसवार| “हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन करायचं असेल, शहराला नवीन जीवनदान द्यायचं असेल तर अनुभवी शल्यचिकित्सकाप्रमाणे काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र वानखेडेंना एक संधी द्या,” असे प्रभावी आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Former Chief Minister Ashokrao Chavan) यांनी जाहीर सभेत केले. गेल्या तिस–पस्तीस वर्षांपासून विविध आजारांवर उपचार करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकाभिमुख विचारांचे डॉ. राजेंद्र वानखेडे हे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे सांगताना खासदार चव्हाण म्हणाले की, “राजकारणात चांगली माणसं येणं आवश्यक आहे. ज...
The road : ढाणकी मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प — महिनाभरानंतरही दुरुस्तीचा मागमूस नाही

The road : ढाणकी मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प — महिनाभरानंतरही दुरुस्तीचा मागमूस नाही

नांदेड, यवतमाळ, सोशल वर्क
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर ते ढाणकी या मार्गावरील मुख्य रस्ता गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचला असून, अद्यापही त्याकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीचा सण सुरू असतानाही या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. उमरखेड–ढाणकी–गांजेगाव–हिमायतनगर–पळसपूर–डोलारी–सीरपली–गांजेगाव–उमरखेड या मार्गावरील एस.टी. बससेवा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आली आहे. परिणामी, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, आमदार आणि खासदारांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे हिमायतनगर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू आहे. कार्यालयात गेल्यास अधिकारी वारंवार अनुप...
Umarkhed taluka! उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान – प्रशासनावर नाराजी

Umarkhed taluka! उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान – प्रशासनावर नाराजी

उमरखेड, कृषी, यवतमाळ, व्हिडीओ
उमरखेड| यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात काल शुक्रवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावोगाव पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असून, उभ्या पिकांचा नायनाट होऊन, घरांमध्ये कंबरभर पाणी, जनावरं वाहून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. निसर्ग कोपल्याने शेतकरी व कष्टकरी वर्ग हतबल झाला आहे. कधी नव्हे तेवढा पाऊस होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, शेतकरी तरी पुरता नागवला गेला आहे. शासनाची चिमूटभर मदत शेतकऱ्यांच्या जखमा भरू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून, शासनाने हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी केली जात आहे. एव्हढी मोठी विदारक परिस्थिती उद्भवली असताना प्रशासनाने अजून पाहणी केली नसल्याने नागरिक नाराज आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे कि, शासनाने १००% ...
MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

नांदेड, यवतमाळ, राजकीय, हिंगोली
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके नष्ट; खासदार नागेश पाटील यांनी तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे मंजूर करण्यास आणि बँक वसुली थांबवण्याची मागणी केली.   हिंगोली/नांदेड, अनिल मादसवार| हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात आले आहेत. हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड आणि महागांव तालुक्यांतील हजारो हेक्टर शेती नुकसानग्रस्त झाली असून अनेक घरं व ओढ्यालगत भागांवर पुराचा फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, माती वाहून गेली आहे आणि काही भागांत पिकांचे नुकसान अत्यंत गंभीर झाले आहे. पंचनामे वेळेत न होणे आणि नुकसानाचे वास्तविक मूल्यांकन योग्य प्रकारे न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत, खासदार नागेश पाटील...
Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

Paniganga river floods : इसापूर धरणाचा विसर्ग; पैनगंगा नदीला महापूर, शेतकरी संकटात

नांदेड, उमरखेड, यवतमाळ, व्हिडीओ, हिंगोली
यवतमाळ/नांदेड, अनिल मादसवार| गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसासह इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. बोरीच्या जुन्या पुलावरून वेगवान प्रवाह सुरू असून, परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने ऊस, सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कयाधू नदीचे पाणी पैनगंगेत मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून ढाणकी मार्गे विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. हिमायतनगर व उमरखेड तालुक्यातील घारापुर, कामारी, विरसनी, दिघी, चाथरी, बोरी, देवसरी, कोपरा, पळसपुर, डोलारी, सिरपल्ली, कोठा, धानोरा, एकंबा, सावळेश्वर, बोरगडी, वारंगटाकळी आदी परिसरातील शेतीपिकांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला तर गावांलागत पाणी आल्याने गावातील घरातही पाणी शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे....
Yellow alert : यवतमाळ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Yellow alert : यवतमाळ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नांदेड, उमरखेड, यवतमाळ
उमरखेड/यवतमाळ | हवामान विभाग, नागपूर यांनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांच्या भिंती, टिनपत्रे पडण्याची शक्यता असून विज पडल्याने जीवितहानी होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. काय करावे – काय करू नये याबाबत प्रशासनाचे मार्गदर्शन : पुरसदृश्य भागात जाणे टाळावे. विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, झाडाखाली थांबू नये. नदी-नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकी, चारचाकी अथवा बैलगाडीने प्रवास करू नये. धरण क्षेत्र, नदिकाठ किंवा पर्यटन स्थळी जाऊन सेल्फी काढणे वा व्हिडि...
monsoon has resumed : राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

monsoon has resumed : राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

नांदेड, कृषी, नागपूर, मुंबई, यवतमाळ, हिंगोली
मुंबई| अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. 1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह...
Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली

Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली

नांदेड, करियर, यवतमाळ
नांदेड| नांदेड जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. तर नांदेड येथे नूतन जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून अर्जुन झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट-अ संवर्गातील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या 6 जून रोजी राज्य शासनाने केल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत सुधाकर आडे यांच्या निरोप समारंभ नुकताच घेण्यात आला. यावेळी नुतन जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निखिल बासटवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोराळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रभाकर मठपती तसेच जिल्हा नियोजन समितीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे हे 19 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड येथे रूजू झाले होते. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांनी कोरोना काळात आरोग्य विषयक बाबींवर ज...
error: Content is protected !!