Rpf Action : ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफची धडक कारवाई
नांदेड| रेल्वे सुरक्षा बल (RPF) नांदेड विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत यशस्वी कारवाई करत दोन चोरीच्या आरोपींना अटक केली आहे.
पहिली घटना २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता परभणी रेल्वे स्थानक येथे घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर RMS कार्यालयाजवळ गस्त घालत असताना सहाय्यक उपनिरीक्षक अमोल वावळे यांनी एका संशयित व्यक्तीस प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करताना पकडले.
अजय (रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव असून, त्याला ताब्यात घेऊन शासकीय रेल्वे पोलीस (GRP) परभणी यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई त्याच दिवशी ट्रेन क्रमांक १७२०८ एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर – लासूर दरम्यान करण्यात आली. RPF पथकाने S-08 डब्यात संशयास्पद हालचाल...









