HomeनांदेडPolice Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर...

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

नांदेड| नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी सलग कारवाया करत नांदेड शहर व परभणी जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर धाड टाकली.

२७ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरातील छत्रपती चौक येथे आर.एम.आर. कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत रोख २४,३३० रुपये, चार मोबाईल, लेनोवो कंपनीचा एक लॅपटॉप, १५,००० रुपयांचे घरगुती साहित्य तसेच ७९,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ७ आरोपींविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच २८ फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील टाकळकंठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोजे हिंगळा येथील राजक्रीडा व सांस्कृतिक मंडळात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून २०,९०० रुपये रोख व २ मोबाईल जप्त करण्यात आले.

सदर मंडळ हे मूळ चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड येथील पत्त्यावर नोंदणीकृत असल्याचे तपासात उघड झाले असून, त्याच्या परभणी शाखेत बेकायदेशीररीत्या जुगार चालत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच अन्य लागू कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या धाड टाकून जुगार अड्ड्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला. अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा अधिकृत संकेतस्थळावर देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments