HomeनांदेडShilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई...

Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

नांदेड l सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या चौथे राज्य अधिवेशन परळी ( वैजनाथ ) येथील प्रवचन मंडपात ८ व ९ नोव्हेंबर रोजी उत्साहात सपन्न झाले.

परळी शहरात मोठी रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली. उपरोक्त अधिवेशनासाठी उदघाटक म्हणून फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव कॉ.मधुमिता बंडोपाध्याय ह्या होत्या. निवडक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या आशा व गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाल्या होत्या. सदरील अधिवेशन दोन दिवशीय झाले असून सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड, राज्य महासचिव कॉ.ऍड. एम.एच.शेख याची प्रमुख उपस्थिती आहे.

मंचावर कॉ.आनंदी अवघडे, कॉ. पुष्पा पाटील,कॉ. शुभा शमीम, कॉ. आरमायटी इराणी कॉ. प्राची हतीवलेकर, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. डॉ.अशोक थोरात, कॉ.प्रभाकर नागरगोजे, कॉ.मंगल ठोंबरे आदींची उपस्थिती आहे. या अधिवेशनात अध्यक्षपदी कॉ. आनंदी अवघडे, राज्य महासचिवपदी कॉ.पुष्पा पाटील तर खजिनदारपदी कॉ.अर्चना घुगरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नांदेड येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची राज्य उपाध्यक्षपदी तर कॉ. वर्षाताई सांगडे यांची राज्य कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.
सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने नूतन राज्य कमिटीचे अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती सीटू कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments