Homeनांदेडजनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादीचे प्रशिक्षण

जनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादीचे प्रशिक्षण

नांदेड, प्रतिनिधी | भारताची जनगणना २०२७ अचूक, प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड जिल्ह्यात पूर्वतयारीच्या कामाला वेग आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘जनगणना २०२७ – संक्षिप्त घर यादी’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जनगणना २०२७च्या प्रत्यक्ष कामकाजास १ फेब्रुवारी २०२७पासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत प्रगणक व पर्यवेक्षक प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक माहितीचे संकलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणात माहिती संकलनाची पद्धत, कामकाजाची प्रक्रिया, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या जबाबदाऱ्या तसेच जनगणना प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

FB IMG 1790428708427 जनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादीचे प्रशिक्षण

जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याविषयक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने, अचूकतेने आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले.

या प्रशिक्षणास मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, मनपा उपायुक्त अभिजित वायकोस, जनगणना तहसीलदार विपिन पाटील, जनगणना संचालनालयाचे उपसंचालक एस. पी. बागुल, सांख्यिकी अधिकारी पवन गोडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित लिपिक व तांत्रिक सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलोलीच्या नायब तहसीलदार वंदना गवळी यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments