Homeराजकीयसरपंच आरक्षणाने गावागावातील राजकारणाला धग! आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या गोटात खळबळ

सरपंच आरक्षणाने गावागावातील राजकारणाला धग! आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या गोटात खळबळ

कुठे पॅनेलची जुळवाजुळव, तर कुठे ‘किंगमेकर’ होण्याच्या हालचाली

हिमायतनगर,अनिल मादसवार | ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ ते २०३० साठी हिमायतनगर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात पार पडली आणि त्यानंतर तालुक्यातील गावागावच्या राजकारणाला अक्षरशः नवी दिशा मिळाली आहे. आरक्षणाचा ‘कौल’ स्पष्ट होताच अनेक इच्छुकांच्या आशा उंचावल्या, तर काहींच्या राजकीय गणितावर पाणी फेरले गेले आहे.

सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले, यावरच अनेक गावांतील आगामी निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याने आरक्षण सोडतीकडे राजकीय गटांचे बारकाईने लक्ष होते. आता आरक्षण स्पष्ट झाल्याने ‘सरपंचपद आपलेच’ म्हणणाऱ्यांची संख्या वाढणार असून, पडद्यामागील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गात करंजी, धारापूर आणि सिबदरा ज. तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गात वारंगटाकळी, दाबदरी, एकंबा आणि पोटा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नुसूचित जमाती प्रवर्गात सिरपल्ली, बोरगडी, जवळगांव, विरसणी आणि खैरगांव ज., तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गात टेभुर्णी, धानोरा ज., खडकी बा., डोल्हारी आणि सोनारी या ग्रामपंचायती आहेत.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गात सरसम बु., बोरगांव ता., महादापुर आणि सिरंजनी, तर नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्गात पारवा बु., टाकराळा बु., पार्टी ज., चिंचोर्डी आणि दरेगांव यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात वाई, वाशी, कामारवाडी, मंगरूळ, वटफळी, कांडली बु., पारवा खु., पवना, दिघी, आंदेगांव, टेंभी, पोटा खु. आणि खैरगांव ता. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर सर्वसाधारण महिला प्रवर्गात दुधड, सवना ज., वडगांव ज., दरेसरसम, कार्ली पी., पळसपुर, कौठा ज., कांडली खु., कामारी, बळीराम तोडा, वाघी, एकघरी आणि जिरोणा या ग्रामपंचायतींचे आरक्षण झाले आहे.

आरक्षण सोडत संपली असली तरी गावागावातील राजकीय रणधुमाळीची ही सुरुवात मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी, समर्थकांची जमवाजमव, पॅनेलची बांधणी आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी याला आता वेग येऊ शकतो. ज्या गावांत सरपंच पदाचे आरक्षण बदलले आहे, तेथे विद्यमान राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरण्याची संधी निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अद्याप अधिकृतपणे वाजायचे असले, तरी सरपंच आरक्षणाने राजकीय रणशिंग फुंकले आहे. आता कोणता गट कोणाला मैदानात उतरवतो, कोण कुणाची साथ घेतो आणि कोणाची राजकीय ‘फिल्डिंग’ कुठे लागते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा कौल झाला; आता गावागावातील राजकीय डावपेचांना सुरुवात! होणार असून, निवडणुकांची रणधुमाळी बिगुल वाजल्यानंतर चालणार आहे. 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments