Homeनांदेडदुष्काळाच्या दारात हिमायतनगर; प्रशासन जागे कधी होणार?काँग्रेसचे बुधवारी हिमायतनगर तहसीलवर घंटानाद आंदोलन

दुष्काळाच्या दारात हिमायतनगर; प्रशासन जागे कधी होणार?काँग्रेसचे बुधवारी हिमायतनगर तहसीलवर घंटानाद आंदोलन

पावसाअभावी सोयाबीन, कापूस, ज्वारी, हळद संकटात; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाने पाठ फिरवली, पिके करपण्याच्या मार्गावर आली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याची भीती उभी ठाकली आहे. तालुक्यातील शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करत असताना प्रशासन अजूनही दुष्काळाच्या गांभीर्याकडे किती काळ दुर्लक्ष करणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवार, २३ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि हळद या प्रमुख पिकांची अवस्था गंभीर बनली आहे. पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उधारी करून आणि रक्ताचे पाणी करून पिके उभी केली; मात्र निसर्गाच्या दुष्टचक्रात त्यांची मेहनत मातीमोल होण्याची वेळ आली आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर तातडीच्या प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि शासनाच्या दुष्काळी सवलतींचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्याकडून करण्यात येत आहे.

घंटानादाने प्रशासनाला जागे करण्याचा ईशारा – हदगांव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असून तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी शेतकरी व काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, बाजार समितीचे सभापती-उपसभापती व संचालक, सरपंच-उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी तसेच विविध सेलचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आसल्याचे सांगण्यात आले आहे.

दुष्काळाचे संकट डोक्यावर असताना पंचनामे, अहवाल आणि कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत होण्यापूर्वी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

तहसील कार्यालयावर बुधवारी घंटानाददि. २३ सप्टेंबर २०२६, बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, हिमायतनगर येथे “शेतकरी संकटात, प्रशासन कशाची वाट पाहत आहे?” असा सवाल उपस्थित करत काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनाला पाठविण्यात येणार आहे, या आंदोलनानंतर शासन हिमायतनगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments