Wednesday, May 13

मराठवाडा

And then there is the most dangerous risk of all — the risk of spending your life not doing what you want on the bet you can buy yourself the freedom to do it later.

Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

Thunderstorm and hailstorm warning : राज्यात 17 ते 20 मार्चदरम्यान वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मराठवाडा, मुंबई, लातूर, हिंगोली
मुंबई| राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी राज्यातील दक्षिण भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलंगणा व कर्नाटक सीमेलगतच्या भागांमध्ये हवामानाचा अधिक प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान या वादळी पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. 21 मार्चपासून हवामान स्थिर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे ...
Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

नांदेड, कृषी, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा, यवतमाळ, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी...
Old Memories : ४९ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा; टिकोना फार्म, मुळशी येथे भावनिक भेट

Old Memories : ४९ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा; टिकोना फार्म, मुळशी येथे भावनिक भेट

नांदेड, करियर, मराठवाडा
नांदेड | पीपल्स हायस्कूल, नांदेड येथील १९७७ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे आठवे स्नेहमिलन सोहळा शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी टिकोना फार्म, मुळशी (पुणे) येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ४९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी या स्नेहमिलनात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे धागे अधिक घट्ट केले. या स्नेहमिलनास ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यापूर्वी या बॅचचे तीन स्नेहमिलन नांदेड, तीन पुणे, एक नाशिक व एक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले असून, यंदाचे हे आठवे स्नेहमिलन विशेष संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमात अनिल महामुनी, अरुणा महामुनी, श्रीकांत अकोलकर, शशिकांत गोहेल, अनिल अमृतवार, गंगामणी अमृतवार, व्यंकटेश कवटेकवार, बालाजी गिरी, अविनाश जोशी, प्रमोद व ज्योत्सना डुब्बेवार, श्रीकांत व सुनीता मांगुळकर, चंद्रकांत व सुजाता ...
Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

Maharashtra News : महाराष्ट्र नवीन जिल्हे : २२ जिल्हे व ८१ तालुके निर्मितीचा प्रस्ताव, यादी जाहीर

महाराष्ट्र, नांदेड, पुणे, मराठवाडा, मुंबई, यवतमाळ, लातूर, विदर्भ
मुंबई, प्रतिनिधी| महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि प्रशासकीय कामांचा वाढता ताण लक्षात घेता, राज्यात नवीन जिल्हे व तालुके निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ८१ नवीन तालुके निर्माण करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर गंभीर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवीन जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन अधिक गतिमान करणे, नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.  नवीन जिल्ह्यांची गरज का भासते? महाराष्ट्रातील काही जिल्हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या टोकाच्या भागातून मुख्यालय गाठण्यासाठी नागरिकांना ८ ते १० तासांचा...
Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

Air services : मराठवाड्यातील विमानसेवा तोटयात , तरीही नवीन सेवा

नांदेड, मराठवाडा, लेख
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानसेवेला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रतिसाद आहे. तेथून विमानाने प्रवास करणारे प्रवासी दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीदेखील विमान कंपन्यांनी नांदेड - मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यात दळणवळणाच्या साधनेत यामुळे भर पडत आहे . परंतु भविष्यात नांदेड - मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर कदाचित ती विमानसेवा दीर्घकाळ चालेल की नाही, याबद्दल शंका आहे. एकीकडे वंदे भारत रेल्वेला नांदेडपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर वासियांनी याबद्दल उघड उघड टीका सुरू केली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी नवीन वंदे भारत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी सुरू करण्याची जोरदार मागणी चालविली आहे . त्यामुळे त्यांच्या या मागणीला केंद्रीय स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. असे झाले तर नांदेड...
Marathwada ; मराठवाड्यातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करा, निवेदनाद्वारे मागणी

Marathwada ; मराठवाड्यातील आदिवासी महादेव, मल्हार कोळी जमातीसाठी हैद्राबाद गॅझेट लागू करा, निवेदनाद्वारे मागणी

नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र
नांदेड l आदिवासी कोळी समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य कोळी महादेव जमातीचे वतीने मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे व नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे, मागणी करण्यात आली असून मराठवाड्यातील महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट लागु करून मराठा कुणबी प्रमाणपत्र शासन निर्णय काढला आहे तसाच निर्णय राज्य सरकारने कोळी महादेव व मल्हार कोळी जमातीसाठी लागु करावा व समाजावर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात,15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा (निजाम राज्य) भारतामध्ये समाविष्ट झाला, दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी सखाराम सुकदेव बि-हाडे व कार्यकारिणी सदस्य यांनी केली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महादेव कोळी व मल्हार कोळी ह्या दोन जमाती प्रामुख्याने राहतात त्यांचे वास्तव्य बालाघाट पर...
natural purple island : गोदावरी नदीपात्रातील एकमेव “नैसर्गिक जांभूळ बेट ” राज्यसरकारच्या अनास्थेमुळे “नामशेषच्या मार्गावर ..!

natural purple island : गोदावरी नदीपात्रातील एकमेव “नैसर्गिक जांभूळ बेट ” राज्यसरकारच्या अनास्थेमुळे “नामशेषच्या मार्गावर ..!

नांदेड, परभणी, मराठवाडा
लोहा| परभणी जिल्ह्यातील पालम शहरापासून सात किलो अंतरावर असलेल्या व पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीपत्रात मध्यभागीनिसर्गरम्य वृक्षवेली, जांभळाने वेढलेले अद्भुत नयनरम्य असे ‘जांभूळबेट’ (natural purple island) आहे. पण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ,नैसर्गिक पुराचा तडाखा यामुळे २२ एकर असलेले हे बेट आता ९ एकर पुरतेच उरले आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर ते तेलंगणा राज्य या दरम्यान नदीप्रवाह मार्गात कुठेच बेट नाही परंतु राज्य सरकार व लोकप्रतिनिधीची निष्क्रियता पाहता जांभूळ बेटाचे अस्तित्व येत्या काही वर्षात नामशेष होणार आहे. गरज आहे ती संवर्धनाची व संगोपनाची..! पालम - पूर्णा तालुक्याच्या सीमेवरील जांभूळ बेटाचा शोध कसा , कधी लागला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही ,पण पालम तालुक्याचे रहिवाशी निसर्गप्रेमी रमेश पिठ्ठलवाड बेटावर जांभळाची भरपूर प्रमाणात झाडे होती. म्हणून या बेटाला ‘जा...
Bag forgotten – मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग मिळाली परत; नांदेड दमरे जनसंपर्क विभागाची तत्परता -NNL

Bag forgotten – मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग मिळाली परत; नांदेड दमरे जनसंपर्क विभागाची तत्परता -NNL

नांदेड, मराठवाडा, सोशल वर्क
नांदेड। रेल्वे प्रशासनाशी संबंधीत अनेक समस्यांबाबत नेहमी ओरड असली तरी काही वेळा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत सोडवणूकही केली जाते असा अनुभव नांदेडच्या एका महिला प्रवाशाला आला आहे. मराठवाडा एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत डब्ब्यात छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला विसरलेली बॅग परतीच्या प्रवासात पुन्हा त्याच रेल्वेस्थानकावर संबंधीत प्रवाशास जशास तशी परत मिळाल्याने रेल्वे प्रशासनाच्या या सेवेबाबत सुखद अनुभव आला आहे. नांदेडच्या रहिवासी सौ.अंजली गिरीश बाऱ्हाळे या सध्या नोकरीनिमित्त छत्रपती संभाजीनगरला भाग्यलक्ष्मी बँकेत कार्यरत आहेत. काही दिवसांच्या सुटीनंतर त्या दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी नांदेडहून गाडी क्रमांक १७६८८ मराठवाडा एक्स्प्रेसच्या सी २/५२ या वातानुकुलीत डब्यातून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला रवाना झाल्या. छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला सकाळी १० च्या सुमारास उतरताना त्यांची ए...
voter awareness ; मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम – NNL

voter awareness ; मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद,संकल्प पत्र व #मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार #जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधानसभा मतदार संघात राबवित आहेत. या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वा...
Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

करियर, मराठवाडा
मुंबई| विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सह...
error: Content is protected !!