उस्माननगर, माणिक भिसे| भारतीय गोवंशाला महाराष्ट्र शासनाने नुकतेच “राज्य माता-गोमाता” असा दर्जा दिला असून भारतीय गोवंशाच्या परिपोषणाकरिता रुपये 50 प्रति दिन प्रति गोवंश अनुदान घोषित केले आहे या दोन्ही प्रस्तावांचा पाठपुरावा गोसेवा आयोगाने केला आहे. तसेच भविष्यात गोशाळा स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील गोशाळांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन तयार केलेली उत्पादने गोसेवा आयोगामार्फत विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.


उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे पोखरभोसी ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.नुकताच गोवंश निवारा व चारा गोदाम उभारणीसाठी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शेखरजी मुंदडा हे होते. तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ प्रणिताताई देवरे यांनी आपले मनोगत मांडतांना म्हणाल्या की , गोमतेला दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व मराठी भाषेला अभिजीत मराठी भाषा म्हणून घोषित केल्याबाबत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार व्यक्त केले.


या गोशालेत गुजराती समाजातील गोभक्तांकडून समर्पित भावनेने होत असलेली गोसेवा पाहून डॉ.सुनीलजी सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग पुरस्कृत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत कृषी गोविज्ञान बहुउद्देशीय प्रतिष्ठान, लोहा संचलित श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी ता.लोहा येथे गोवंश निवारा व चारा गोदामचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गोशाळेंना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रुपये पंधरा लाख ते पंचवीस लाख एवढे अनुदान महाराष्ट्रातील एकूण 135 गोशाळांना वाटप केले असून त्या अंतर्गत प्रस्तावित विविध कामांचे भूमिपूजन व बांधकाम सुरू झालेले आहे.

ह.भ.प.डॉ. बाळासाहेब साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी येथे वयोवृद्ध, आजारी, कुपोषित व कत्तलसाठी जाताना अडवलेल्या गोवंशांचं संगोपन केले जाते. ह्या गोवशांना स्थायी निवारा व चारा गोदामचे बांधकाम प्राप्त अनुदानातून करण्यात येत आहे. यावेळी मा.डॉ. सुनीलजी सूर्यवंशी सदस्य, महाराष्ट्र गोसेवा आयोग,श्री भाऊराव कुदळे क्षेत्र प्रमुख गोरक्षा विभाग विश्व हिंदू परिषद मुंबई, ह भ प माधव महाराज केंद्रे अध्यक्ष, ह भ प डॉ. बाळासाहेब साजणे,श्री नवीनजी भाई ठक्कर, श्री सनत कुमारजी महाजन,श्री मारोती कंटेवाड जिल्हाध्यक्ष गोशाळा महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे रामजीभाई गोरी,केंद्रे महाराज, डॉ.सजने साहेब, सौ. मथुराबाई डांगे,किसन डांगे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे डॉ.एस.सी. बिलोलीकर जिल्हा पशुसंवर्धन सहा.उपायुक्त,श्री चंद्रकांत पवार सहा.पो. नि.उस्माननगर, श्री.मोहनराव पवार उपअभियंता सा.बां.विभाग लोहा,डॉ. रंगनाथ पुरी पशुधन विकास अधिकारी लोहा, डॉ.अजय शिवनकर पशुधन अधिकारी कलंबर, डॉ.मेहेर सहा.पशुसंवर्धन उपायुक्त कंधार, सौ. मीराबाई कैलास गिरी सरपंच पोखरभोसी,नरेंद्र गायकवाड मा.उपसभापती,पत्रकार सूर्यकांत माली पाटील या समवेत गोभक्त व गोप्रेमी शंभूभाई मंगे, शांतीभाई पटेल, हर्षदभाई शहा, महेंद्रभाई गणात्रा, चिमणभाई भानुशाली, गिरीश जोशी, सुरेश मंत्री, शशिकांत पाटील,राजू सोनटक्के,ह.भ.प.भालेराव गुरुजी,ह.भ.प.नामदेव कळसकर,संतोष बियाणी, श्रीमती शकुंतला बियाणी,प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास कापरती, आशिष कदम हदगाव, रोडे साहेब लोहा पो.स्टे.,सत्यवानजी गरूडकर,वीरभद्र मठपती मुखेड,गणेश घोरबांड लाठ खुर्द,बालाजी गोरे, गोविंदराव पाटील सिंधीकर यांची विशेष उपस्थिती होती.
लड्डूजी पुरोहित यांच्या वतीने सर्व गोप्रेमी गोभक्तांसाठी स्वादिष्ट महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक महीला उपस्थित होत्या. आजच्या शुभ प्रसंगी गोमाता चाऱ्यासाठी करसनभाई जलाराम काटा वाला कडून नऊ हजार व शंकरभाई छाभैया कडून अकरा हजार निधी देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेत कैलास अमिलकंठवार, भवानभाई पटेल, रामजीभाई भानुशाली (गोरी) गोविंद डांगे, पर्वतभाई पटेल संतरामजी दमकोंडवार,राजू डांगे,सिद्धेश अमिलकंठवार, हिरालालजी घंटे,रामजीभाई भानुशाली, करसनभाई पटेल, हरेशभाई ठक्कर,पिंटू ताटे, श्याम डांगे, पप्पू मिस्त्री,रवी नंदेवाड,किसन डांगे,रतन ताटे,गंगाधर नीलकंठे ,मारोती तुप्पेकर,मुरली पा.डांगे, गजानन महाराज इंगोले यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम भराडिया उद्यान अधिक्षक स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व आभार प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांनी मानले.