HomeनांदेडNavratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही...

Navratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही मागणी -NNL

नवीन नांदेड। गेल्या चार वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या तिरुपती बालाजी मंदिर येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला श्री बालाजी मंदिर देवस्थान हडको च्यावतीने करण्यात येत असलेल्या प्रसादाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात मागणी केली असून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील व विदेशात येथील स्थायिक भाविक भक्तांनी मागणी केली आहे.

नवरात्र महोत्सव निमित्ताने ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्त्सव आयोजित करण्यात आला असुन तिरुपती बालाजी मंदिर तिरूमाला येथील प्रसिद्ध असलेल्या वडा प्रसादाला मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात मागणी करतात त्याच बरोबर बुंदीलाडूचीही भक्तांना आवड असल्याने त्याची मागणी मोठया प्रमाणात करण्यात आल्या नंतर गेल्या चार वर्षांपासून हडको येथील बालाजी मंदिर देवस्थान येथे या प्रसादाला सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भक्त गणांनी मागणी करून गंगाळ मध्ये ही भावीक नोंदणी करत आहेत.

हडको येथील बालाजी मंदिर विश्वस्त समितीने गेल्या अनेक वर्षांपासून आचारी असलेल्या बालाजी आनेराय यांनी त्यांचा महिला व पुरुष यांच्या सोबत घेऊन जवळपास २० पुरुष व महिला यांच्या सहाय्याने चार दिवसांत ३ क्टिवटंल वडा तयार करून दिला असून दसरा पर्यंत ७ किवटंल वडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले, वडा हा हिंग व कस्तुरी मेथी मिश्रण असलेला हा वडा प्रसाद म्हणून अनेक दिवस तो चांगला राहू शकतो व पचनास उपयुक्त असल्याने व चविष्ट दर्जाचे असल्यामुळे अनेकांनी मागणी केली ,या सोबत लाडू ,खिचडी , चणा ,चित्रान्न ,साखर भात ,या गंगाळ मध्ये नवरात्र उत्सवात भक्तांची मोठ्या प्रमाणात मागणी असते ,प्रति नग वडा व बुंदीचा लाडू दहा रुपये असल्याने भाविक मोठया प्रमाणात गर्दी करीत आहेत ,याशिवाय मंदिर देवस्थानला अन्नदान व देणगी देणाऱ्या भाविक भक्तासाठी लाडू ,गंगाळ देवस्थानच्या वतीने विनामूल्य देण्यात येत आहे भक्तांसाठी ब्रम्होत्सव दसरा निमित्य विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवहाण विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोंडवार ,उपाध्यक्ष गोवर्धन बियाणी,सचिव बाळासाहेब मोरे,बाबुराव येरगेवार,कोषाध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, सह सचिव बाळकृष्ण येरगेवार, संस्थापक अध्यक्ष माणिकराव देशमुख करणसिग ठाकूर, संतोष वर्मा,संजिवन राजे, अजय भंडारी, विवेकानंद देशमुख,प्रकाशसिंह परदेशी, ्सचिन नपाते, सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख व विश्वस्त पदाधिकारी यांच्या सह आचारी बालाजी हनमंत आनेराय व त्यांचे विसजण सहकारी परिश्रम घेत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments