नवीन नांदेड l कंबोडिया येथे होणाऱ्या किकबॅक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिडको येथील कुं. दिपा गवळी हिला वंचित बहुजन आघाडीच्ये राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन तीच्या सत्कार करण्यात आला.


१ आक्टोबर रोजी माता रमाई बौद्ध विहार शाहूनगर येथे,कंबोडिया येथे होणाऱ्या किकबॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिडको नवीन नांदेड येथील कु.दीपा गवळे हिचा वंचित बहुजन आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला व वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार फारूख अहेमद यांच्या वतीने कुं. दीपा गवळे हीला तिला परदेशात जाण्यासाठी आर्थिक मदत म्हणुन 25,000 रूपयाची भेट नांदेड दक्षिण वंचित बहुजन आघाडीच्ये महानगर अध्यक्ष विट्टल गायकवाड ,तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

या वेळी महासचिव अमृत नरंगलकर, सामजिक कार्यकर्ते अनील बेरजे,सल्लागार साहेबराव भंडारे,प्रा.नंदकुमार गचे,श्यामराव कांबळे, गौतम डूमणे, पिराजी लोहकरे, प्रदीप जोगदंड,राम भद्रे,ॲड. ढगे ,नागोराव गायकवाड,सम्राट आढाव,संघरत्न भालेराव,
दीपा गवळे हीचे आई वडील,भोळे ताई , आढाव ताई शिवाजी कांबळे ,राजू जमदाडे, बापूराव जमदाडे,याच्या सह शाहूनगर परिसरातील अनेक महिला, युवक,उपस्थित होते.
