नवीन नांदेड l हडको येथील श्री.बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने भाविक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी बालाजी मुर्ती साठी जयपूर येथील कारागीर मार्फत साडे तीन किलो चांदीचे मुर्तीसाठी अलंकार भेट म्हणून दिले यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने सपत्नीक सत्कार केला.


हडको येथील बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने २२ व्या ब्रम्होत्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी औधोगिक वसाहतीतील उद्योजक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी मंदिरातील मुर्ती साठी अलंकार अर्पण करावयाचे आहे यासाठी गेल्या अनेक दिवसापूर्वी चन्नावार ज्वेलर्स नांदेड यांच्या मार्फत जयपूर राजस्थान येथून कारागीर बोलवून मुर्ती साठी अलंकार म्हणून त्यांनी सविस्तर मोजमाप घेऊन आकर्षक सुबक व देखणे असे अलंकार तयार केले.

नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित ब्रम्होत्त्सव आयोजित पहिल्या दिवशी सकाळी विधीवत पुजन करून दुबे महाराज व पुरोहित सतिश गुरू यांच्या वतीने विधीवत पुजन करून व सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी दिलेले साडे तीन किलो चांदी अलंकार चढविण्यात आले,या मुळे मुर्ती अधिक आकर्षक दिसु लागली विश्वस्त समिती अध्यक्ष अरूण दमकोडंवार,माणिक देशमुख बि. आर.मोरे,काका ,विवेकानंद देशमुख,किशोर देशमुख चंद्रकांत चव्हाण यांनी वटमवार यांचे सप्तनीक सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने नवरात्र ब्रम्होत्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम यांच्या लाभ घेऊन मंदिराला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
