Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

aa 1 Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

हिमायतनगर| शहराजवळील हिमायतनगर–सिरंजनी रोडवर शनिवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय धान्य गोदामातून कोठा व एकंबा गावाकडे रेशनचे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक (MH26-7776) सिरपल्ली–सिरंजनी मार्गावरून येणाऱ्या दुचाकीला (MH29-AZ 4538) एचपी गॅस गोडाऊनसमोर जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील गणेश सदाशिव जाधव (वय ५५, रा. सिरपल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर विठ्ठल वानखेडे (वय ४०, रा. सिरपल्ली) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकून पडल्याचे दृश्य घटनास्थळी दिसून आले.

aa Himayatnagar Accident : हिमायतनगरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top