हदगाव, शेख चांदपाशा। कोणतेही पद नसताना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या विकासा बरोबर सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी, पैनगंगा नदीकाठावरील जनेतच्या पाणी समस्यासाठी बाबुराव कदम कोहळीकर यांनी जीवाचे रान केले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांना लोकनेते तथा शेतकरी नेते म्हणून समबोधले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदार संघात कोट्यवधींचा निधीतुन पैनगंगा नदीवर पूल कमं बंधारे मंजूर करून आणत, विविध रस्ते, समाज भवन यासह अनेक गरजू वंचितांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाट उचलला आहे. त्यांच्या याचं कार्याची पावती म्हणून लोकसभा निवडणुकीत जनतेने भरघोस मतदान दिले, मात्र यात त्यांचा प्रभाव झाला. असे असले तरी पुन्हा नव्या जोमाने त्यांनी मतदार सांघट आपली पकड मजबूत करण्याला सुरुवात केली असून, त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या विकासासाठी चालविलेले धडपड आगामी विधानसभा निवडणुकीत तारणार..? असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


निवडणूकीचा निकालाच्या जय हो नंतर हिगोली लोकसभा महाविकास आघाडीचे नवे खा. नागेश पाटील आष्टीकर यानी हिगोली मतदार संघात ज्या विधानसभाक्षेञांत महाविकास आघाडीला मतरुपी लिड दिली. त्या विधानसभा क्षेञात जावून मतदाराचे व महाविकास आघाडीच्या नेत्यांच पदधिका-याच प्रथम आभार माणले. माञ हदगाव विधानसभा क्षेत्रांत लीड का कमी मिळाली…? या बाबतीत स्थानिय पातळीवर माञ महाविकास आघडीतील कोणी पदधिकारी स्पष्टीकरण दयायला पुढ येत नाही. या बाबतीत महाविकास आघडीच्या खासदारांच्या मणात कुठं तरी नाराजी आहे माञ या बाबतीत सध्या तरी ते ‘मौण ” बाळगुन आहेत. परंतु महायुतीचे पराभूत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर पराजयाच आळस झटकून हदगाव विधानसभा क्षेञाच्या दुस-या इनिंग करिता लढेंगे तो जितेंगे असे म्हणत नव्या जोशात त्याचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसुन येत आहे.

इतकेच नव्हे तर हदगाव तालुक्यातील अत्यंत गरीब व दुर्लक्षित असलेल्या पारधी समाजाच्या एका युवकास मधमाश्या दंशाने केल्याने मृत्य झाल्याची माहीती बाबुरावजी कदम कोहळीकर यांना मिळताच त्यानी भेटी दरम्यान स्वतः च्या हस्तक्षरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना दृदैवी घटना अवगत करून दिली, आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याच्या मागणीला लगेच मान्यता दिल्याने त्या पारधी समाजाच्या बेघर झालेल्या परिवाराला मुख्यमंत्री सह्याता निधीतुन पाच लाखाची मदत मिळवून दिली. यामुळे शिवसेना (शिदेगट) बाबुरावजी कदम कोहळीकर हदगाव विधानसभा क्षेत्रांत आणखीनच सर्वसाधारण नागरिकात मध्ये चर्चेला आले आहेत.


तसे पाहीले तर कोविडच्या काळात ज्या लसचा तुटवडा (रेमडीसवर ) तुटवडा होत असतांना ही बाबुराव कदम यांनी हदगाव तालुक्याच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तिना मदत केली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यावर असलेला विश्वास यामुळेच कोविडच्या काळात बाबाराव कदम कोहळीकर यानी सर्वसामन्य रुग्णासाठी बरेच कार्य केले आहे. पैनगंगा नदीकाठावरील जनेतच्या पाणी समस्यासाठी त्यांनी मंत्रालय स्तरावर धाव घेऊन पाणी मिळवून दिले आहे. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदार संघात कोट्यवधींचा निधीतुन पैनगंगा नदीवर पूल कमं बंधारे मंजूर करून आणले असून, विविध रस्ते, समाज भवन यासह अनेक वंचितांना न्याय मिळवून देऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच हदगाव विधानसभा क्षेञाच अवलोकन केलं तर त्यांची जमेची बाजु दिसुन येते. हदगाव विधानसभा क्षेञात एकुण मतदार २ लाख ४५ हजार आहे. त्यापैकी १ लाख ९०हजार मतदान लोकसभेत करिता झालं मतदानाची टक्केवारी ६५%इतकी होती. शिवसेना (ठाकरेगट) नागेश पाटील आष्टीकर यांना ७५ हजार ३८९ एवढे मतदान पडले तर शिवसेना (शिदेगट) चे बाबुराव कदम कोहळीकर यांना ७३ हजार ७५१ एवढे मतदान झाले आणि वचित बहुजन आघाडीचे उमेदवार डाँ बीडी चव्हाण याना २४ हजार ७८३ मते पडलेली आहे.
विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेना फुटली शिवसेनेचे दोन उमेदवार उभे टाकल्याने काँग्रेसचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी लढतीत सहज बाजी मारली होती. माञ त्यावेळी बाबुराव कदम कोहळीकर हे अपक्ष कुणाचाही साथ नसतांना जनता जनार्धनच्या विश्वासावर त्यांनी बड्या राजकीय उमेदवाराना चांगलाच हदरा दिला होता. या लोकसभेच्या निवडणूकीत ही हदगाव विधानसभाक्षेञात ७३ हजार ७५१ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकवर आहेत. वास्तविक पाहता शिवसेनेच्या (शिदेगट) गटाकडुन त्याना विधानसभेची निवडणूक लढवायची होती. परंतु ऐनवेळी त्यांना हिगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.

