Homeनांदेडभूमी अभिलेख विभागाला ४५ लॅपटॉप; डिजिटल सेवांना मिळणार गती

भूमी अभिलेख विभागाला ४५ लॅपटॉप; डिजिटल सेवांना मिळणार गती

नांदेड | भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक आधुनिक, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला ४५ अद्ययावत लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हे लॅपटॉप विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ‘गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन’ या योजनेतून हे आधुनिक लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, महापौर श्रीमती कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सीमा देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

भूमी अभिलेख विभागाचा थेट संबंध शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाशी येतो. जमिनीची मोजणी, सीमांकन, डिजिटल सातबारा, मिळकत पत्रिका (Property Cards), ई-फेरफार यांसारख्या महत्त्वाच्या सेवा मोठ्या प्रमाणात ऑनलाइन आणि तंत्रज्ञानाधारित झाल्या आहेत. अद्ययावत संगणकीय उपकरणांमुळे या सेवांच्या कामकाजाला आणखी गती मिळेल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

नवीन लॅपटॉपमुळे मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यास, ऑनलाइन फेरफार व मिळकत पत्रिकांच्या नोंदींमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यास तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना जलद, सुलभ आणि वेळेत डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यास हातभार लागणार आहे.

भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचे आधुनिकीकरण करून नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ४५ लॅपटॉपचे वितरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब कमी करून सेवा अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न यामुळे बळकट होणार आहे.

FB IMG 1786786009704 भूमी अभिलेख विभागाला ४५ लॅपटॉप; डिजिटल सेवांना मिळणार गती

अद्ययावत संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नांदेड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. नवीन लॅपटॉपमुळे क्षेत्रीय कामकाजासह कार्यालयीन प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याच्या भावना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या जमिनीशी संबंधित कामांना डिजिटल वेग मिळणार असल्याने भूमी अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणाला या उपक्रमामुळे आणखी चालना मिळणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments