Homeआरोग्यआरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

‘सेवा संकल्प’, ‘माझं गाव–आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘तिसीचा पल्ला’ अभियानांना गती देण्याचे आरोग्य आयुक्त संजय काटकर यांचे निर्देश

नांदेड| शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांना सुलभ, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश आरोग्य आयुक्त संजय काटकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काटकर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर विभागाची विभागीय आरोग्य आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य सेवा, लातूर मंडळाच्या उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्यासह लातूर, बीड, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, शासकीय योजना आणि जनजागृती अभियानांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’, ‘माझं गाव–आरोग्य संपन्न गाव’ आणि ‘तिसीचा पल्ला–तपासणी अन् सल्ला’ या अभियानांना अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विशेषतः ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी, आजारांचे वेळेत निदान आणि आवश्यक उपचार यावर भर देण्यात आला. उच्च जोखमीच्या गर्भवती मातांची शंभर टक्के ओळख पटवून त्यांना आवश्यक उपचार व संदर्भ सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

FB IMG 1790688290006 आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

आरोग्य संस्थांमधील प्रयोगशाळा व रक्तपेढी सेवा सक्षम करण्यासोबतच रक्ताचा साठा व वितरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञांचा सल्ला सहज उपलब्ध व्हावा यासाठी टेलिमेडिसिन सेवा अधिक गतिमान करण्यावरही भर देण्यात आला.

दरम्यान, अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध नियमानुसार प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जन आरोग्य समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करून नागरिकांना आरोग्य संस्थांमधून उत्तम सुविधा देण्यावर भर देण्याचे निर्देश आरोग्य आयुक्तांनी दिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments