किनवट, परमेश्वर पेशवे। नववर्षाच्या प्रारंभालाच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तब्बल पंधरा वर्षे या मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारे माजी आमदार प्रदीप नाईक यांचा आज सकाळी ५.३० मिनिटाला हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबाद येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते शरदचंद्र पवार गटांचे ज्येष्ठ नेते होते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत होता.
एवढेच नव्हे तर त्यांनी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली. बंजारा समाजावर त्यांचे कायमस्वरूपी प्रभुत्व होते. इतर समाजात सुद्धा त्यांच्या कार्याची छाप निर्माण झाली होती. एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व किनवट माहूर मतदार संघाने नववर्षाच्या प्रारंभालाच गमावलं माजी आमदार प्रदीप नाईक यांच जाण हे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी पोकळी निर्माण करून गेलं. हजारो चहा त्यांचा नेता अखेर पडद्याआड गेला.
राजकारण करत असताना कधी हाडा वैराचे व सूडभावनेचे राजकारण त्यांनी कधी केले नाही. त्यामुळे त्यांना विरोधक हि विरोध करत नसत. मृत्यूसमयी ते 69 वर्षाचे होते. त्याच्या पश्चात त्यांना पत्नी दोन मुली जावई व मुलगा कपिल नाईक व सून व नातवंडे असा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता.उद्या दिनांक २ रोजी त्यांच्या राहत्या गावी दहेली या ठिकाणी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त होत आहे.