नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या मौजे वाघी ता.जि.नांदेड येथे नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात अनावरण झाले. लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या नियोजित जागेच्या वादातून उदभवलेल्या परिस्थितीत माकप कार्यकर्ते आणि वाघी येथील नागरिकांची ओळख झाली आहे.
चार वर्षांपूर्वी वाघी येथील काही नागरिक सीटू कामगार संघटनेत सामील झाले होते. त्यापैकी काही जणांनी पक्ष सभासद होऊन स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मागील दोन वर्षांपासून तेथे पक्ष युनिट असून आता पक्षाच्या फलकाचे अनावरण तेथे करण्यात आले आहे. गावातील मुख्य चौकात दर्शनी भागात फलक लावले असून, माकप तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरवात झाली.
पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वला पडलवार, सीटू राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, जमसंच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.लता गायकवाड आदींच्या संयुक्त वतीने रिबीन कापून अनावरण करण्यात आले. यावेळी शाखा सेक्रेटरी कॉ.गंगाधर खुणे, सचिव मंडळ सदस्य कॉ. बालाजी पाटील भोसले, कॉ.रमेश गायकवाड यांचा उपस्थित नेत्यांनी पुष्पहार घालून सन्मान केला व पुढील कार्यास सदिच्छा दिल्या. यावेळी डीवायएफआयचे कार्यकर्ते कॉ.श्याम सरोदे आणि कॉ.जयराज गायकवाड यांची उपस्थिती होती. या अनावरण कार्यक्रमासाठी गावाकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते.