नांदेड| महाराष्ट्रात प्रतिबंधीत केलेला पान मसाला, गुटखा एकुण किंमत 4 लक्ष 84 हजार, 02मोबाईल फोन असा एकुण किंमत 25 हजार रुपयाचा मुद्देमाल सहा. पोलीस अधीक्षक शफकत आमना भोकर यांचे मार्गदर्शना खाली हदगांव पोलीसांनी वाहतुक करणारे वाहण पकडले या कार्यवाहीची गुटखा माफ़ियामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.30.12.2024 रोजी पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे आदेशाने 23.00 ते दि.31.12.2024 चे 04.00 वाजेच्या दम्यान पोलीस स्टेशन हदगांव हददीत तामसा टि पॉइंट येथे लावण्या आलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहण चेकिंग करीत असतांना एका काळया रंगाचे रेनॉल्ट ट्रायबर मधुन महराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थाचा साठा चोरटी विक्री करण्याचे उददेशाने 1) मकरम अली खान राशीद अली खान वय 35 वर्ष रा. हिंगोली 2) शेख मुजम्मील शेख खदीर वय 33 वर्ष रा. आझाद कॉलनी हदगांव या आरोपींनी सगंणमत करुन वाहतुक करताना मिळुण आले आहे.
कार्यवाही दरम्यान एकुण 4 लक्ष 84 हजार रुपये किमतीची गुटखा 25 हजार रुपये किमतीचे 02 मोबाईल फोन व 7 लक्ष रुपये किमतीची रेनॉल्ड ट्रायवर कार दोन पंचा समक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आली आहे. सरकार तर्फे फिर्यादी पोहेको 1976 भिमराव मुंगराव नरवाडे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा नोंद करुन पुढील तपास पोउपनी राजेश नंद हे करीत आहेत. हि कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक जिल्हा नांदेड. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती शफकत आमना सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग भोकर, राजेश पुरी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगांव, राजेश नंद पोउपनी पोलीस स्टेशन हदगांव, पोहेकों भिमराव सुगराव नरवाडे, पोलीस स्टेशन हदगांव, पोकों.प्रकाश सुधाकरराव देशमुख पोलीस स्टेशन हदगांव, पोकों. इम्राणखान अमान्नुल्लाखान पठाण पोलीस स्टेशन हदगांव, पोकों. जेठण भाऊराव पांचाळ पोलीस स्टेशन हदगांव यांनी केली आहे.