Wednesday, May 13

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Community Marriage : “सामुदायिक विवाह सोहळा : सामाजिक बांधिलकीतून सुखी संसाराकडे एक भक्कम पाऊल”

Community Marriage : “सामुदायिक विवाह सोहळा : सामाजिक बांधिलकीतून सुखी संसाराकडे एक भक्कम पाऊल”

नांदेड, राजकीय
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मा. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हदगाव येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या मराठवाड्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहता अशा सामुदायिक विवाह सोहळ्यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. दुष्काळ, शेतीतील अनिश्चितता, वाढते आर्थिक संकट, बेरोजगारी आणि विवाहासाठी होणारा प्रचंड खर्च यामुळे अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो. अनेक गरीब, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य कुटुंबांना आपल्या मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पाडणे कठीण जाते. अशा वेळी सामुदायिक विवाह ही केवळ एक सामाजिक परंपरा नसून, ती समाजाला दिलासा देणारी आणि आर्थिक बचतीची प्रभावी चळवळ ठरते. कमी खर्चात, सन्मानाने आणि सामा...
तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

तुम्ही जनतेचे मालक नसून सेवक आहात हे विसरू नका -खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना झापले

नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव हिमायतगर येथील महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी स्वतःला जनतेचे मालक समजून वागत असतील तर त्यांनी तो भ्रम काढून टाकावा. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे विसरू नका,अशा कडक शब्दांत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव येथे शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एमएसईबी (MSEB) प्रशासनाचे कान टोचले. बोरगाव येथील दुर्दैवी घटनेला अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खासदारांनी संताप व्यक्त केला. बोरगाव घटनेवरून बैठकीत रणकंदन झाला काही दिवसांपूर्वी बोरगाव येथे वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत खासदारांनी हदगाव-हिमायतनगर विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतून प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. घटनेल...
Eknath Shinde arrives : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन  

Eknath Shinde arrives : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन  

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,  मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड,  अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पुढील नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड विमानतळावरून प्रयाण केले....
Narayan Kale : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड

Narayan Kale : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मदसवार | मराठा सेवा संघ यांच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नारायण काळे यांनी सांगितले की, मराठा सेवा संघाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी ते कार्यरत राहतील. संघटनेने सोपवलेली जबाबदारी पूर्ण विश्वासाने पार पाडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष, श्री शिंदे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री शेरा पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सतीश जाधव, सहसचिव श्री डाखोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सारंग मीराशे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव आनंद कदम, डॉ. गफार कार्लेकर, मुना शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मारोती मिरटकर आदींचीही उप...
Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

Nanded Municipal Corporation : नांदेड महानगरपालिकेत नवे पदाधिकारी; विरेंद्रसिंघ गाडीवाले स्थायी समिती सभापती

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर-पालिकेच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या पदांसाठी मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी ११ वाजता झालेल्या या निवडणुकीत भाजपचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते, तर महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचीही उपस्थिती होती. निवडणुकीदरम्यान स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील टियर-२ व टियर-३ शहरांसाठी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस मागणी केली. या योजनेच्या पुढील टप्प्यात ३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जास्तीत जास्त शहरांना बसेस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तरादरम्यान स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेबाबत आज झालेल्या चर्चेत सहभागी होताना खा. अशोकराव चव्हाण यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार इलेक्ट्रिक बसेसचे वितरण करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे नागरिकांना माफक दरात पर्यावरणपूरक प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी नमूद ...
“डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

“डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

नांदेड, राजकीय
नांदेड| महापुरुषांच्या जयंती उत्सवाला योग्य दिशा देत डीजे मुक्त व व्यसनमुक्त साजरीकरणाचा संदेश देणाऱ्या जयंती मंडळांचा नांदेडमध्ये सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून “उत्सवात गोंगाट नव्हे, विचारांचा वारसा जपा” असा ठाम संदेश समाजाला देण्यात आला. मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेविरहित पद्धतीने साजरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महापुरुषांच्या जयंती हा केवळ उत्सव नसून विचारांचा वारसा पुढे नेण्याची संधी आहे. डीजेच्या आवाजात आणि व्यसनांच्या आहारी जाऊन साजरी होणारी जयंती समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य ...
Minister Sanjay Rathod : पायाभूत सुविधा बळकटीसाठी ठोस निर्णयांवर भर : मंत्री संजय राठोड

Minister Sanjay Rathod : पायाभूत सुविधा बळकटीसाठी ठोस निर्णयांवर भर : मंत्री संजय राठोड

नांदेड, राजकीय
नांदेड| देश व राज्य पातळीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून ठोस व धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन संजय राठोड यांनी केले. माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या शक्तिपीठ बंधाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. दीक्षागुरू प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, धरमसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री राठोड म्हणाले की, माहूर गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात व पैनगंगा नदीत स्नान करतात; मात्र आवश्यक सुविधा अपुऱ्या होत्या. शक्तिपीठ बंधाऱ्याच्या माध्यमातून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध होणार असून हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्...
‘Loknete Gopinathrao Munde Panpoi : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रम

‘Loknete Gopinathrao Munde Panpoi : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रम

नांदेड, राजकीय
नांदेड| गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर समाजसेवेची परंपरा जपत धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई’ या उपक्रमाचा २५ वा वर्ष सुरू करण्यात आला. गुरुवारी भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे राम अय्यर होते, तर भाजपा उपाध्यक्ष बागडया यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना राम अय्यर म्हणाले की, “निष्ठावान कार्यकर्ते असूनही स्वीकृत सदस्य पद न मिळाल्यानंतरही ॲड. दिलीप ठाकूर यांनी नाराजी न दाखवता सेवा कार्य सुरू ठेवले. आजच्या राजकारणात अशी वृत्ती दुर्मिळ असून, त्यांच्या कार्यातून वेगळेपण स्पष्ट दिसून येते.” गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील १६ गावांतील प्रवासी तसेच मिलरोड वसाहतीतील नागरिकांसाठी उन्हाळ्यात शीतपाणी उपलब्ध करून देण...
Daawat-e-Iftar : रमजान ईद निमित्त हिमायतनगरमध्ये भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Daawat-e-Iftar : रमजान ईद निमित्त हिमायतनगरमध्ये भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र) सणाच्या पार्श्वभूमीवर हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने शहरातील चौपाटी परिसरातील दारुल उलूम येथे भव्य दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सौहार्दपूर्ण वातावरणात सर्वांनी एकत्र येत इफ्तारचा आनंद लुटला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला रमजान ईदचा सण आनंदात साजरा व्हावा तसेच समाजात भाईचारा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या इफ्तार पार्टीला हिमायतनगर शहरातील हिंदू, मुस्लिम तसेच विविध समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. यावेळी विजय वळसे यांनी आमदारांच्या वतीने उपस्थित सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. अजान होताच सायंकाळी ६.३७ वाजता इफ्त...
error: Content is protected !!