HomeनांदेडAccident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू – एकजण गंभीर

हिमायतनगर, प्रतिनिधी | भोकर हिमायतनगर महामार्गावर असलेल्या पोटा आबादी जवळ उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या घटनेत दुचाकी चालक आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील एकजण गंभीर असलेल्या सहा वर्षीय मुलास उपचारासाठी नांदेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका चिमुकल्या बालकांचा अपघातात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले बालाजी गंगाराम नाचारे वय (50) आरूष रतन नाचारे, अक्षय माधव शेळके वय 06 हे तिघेजण दुचाकीवर जात असताना भर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या घटनेत दुचाकीस्वार बालाजी नाचारे व यांचाच नातू आरूष रतन नाचारे हा जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली सदरील हि घटना पोटा अबादी जवळील मनिषा आश्रम शाळेजवळ रविवारी दुपारी घडली आहे.

IMG 20260510 WA0011 Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

या घटनेतील गंभीर अक्षय माधव शेळके असल्याने त्यास उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले असुन उपचार सुरू आहेत.हिमायतगनर येथील उपजिल्हा रुग्णालयात मयत बालाजी नाचारे यांचे श्वेछदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले जवळगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.अनेक मोठ मोठी वाहने मुख्य रस्त्यावर उभे करत असल्याने अपघात घडत आहेत.

IMG 20260510 WA0010 Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

भोकर हिमायतनगर या महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या गावाजवळ गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी वारंवार होत असुन देखील बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेका़चे जिव अपघातांत जात आहेत.

IMG 20260510 WA0008 Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

पोटा ,सरसम या गावालगत महिन्यात दोन चार अपघातांच्या घटना घडत असुन अनेकांचे जिव जात आहेत.भोकर हिमायतनगर या महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या जिप,ट्रक,हायवा यामुळे अनेक अपघातांच्या घटना घडत आहेत तरी देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष केले असल्याने मोठ मोठे अपघात घडत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments