Homeनांदेडसिरपल्ली–डोलारी–हिमायतनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य अवघ्या तीन महिन्यांत रस्त्याची दुरवस्था

सिरपल्ली–डोलारी–हिमायतनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य अवघ्या तीन महिन्यांत रस्त्याची दुरवस्था

थातूरमातूर दुरुस्ती करून बिले काढण्याचा प्रयत्न होतं असल्याचा आरोप

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली–डोलारी–हिमायतनगर या मार्गाची अवघ्या तीन महिन्यांतच दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर उखडून गेल्याने ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता नागरिक व वाहनधारकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रस्त्याचे काम करताना संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्ता पूर्ण होऊन काही महिने उलटत नाहीत तोच रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या संबंधित ठेकेदाराकडून या खड्ड्यांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे.

मात्र, खड्डे बुजविताना प्रथम खड्ड्यातील धूळ व माती साफ करून योग्य पद्धतीने डांबर व आवश्यक साहित्याचा वापर करणे अपेक्षित असताना, केवळ रस्त्याच्या कडेला पडून असलेली चुरी-गिट्टी खड्ड्यांमध्ये टाकून दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही दुरुस्ती किती दिवस टिकणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

IMG 20260930 WA0032 सिरपल्ली–डोलारी–हिमायतनगर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य अवघ्या तीन महिन्यांत रस्त्याची दुरवस्था

अभियंत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची असताना निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर काम करून संबंधित ठेकेदाराला देयके अदा केली जाणार असतील, तर शासनाचा निधी खर्च करून अशी कामे करण्याचा उपयोग काय? असा संतप्त सवाल हिमायतनगर तालुक्यातील विकासप्रेमी नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

रस्त्याच्या कामाची तांत्रिक तपासणी, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता, कामाची मोजमाप पुस्तिका आणि दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करूनच देयके अदा करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments