Homeकृषीपीक कापणी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक काढू नका; शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

पीक कापणी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक काढू नका; शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

पूर्ण नुकसान झालेल्या पिकांसाठी ‘शून्य उत्पादन पंचनामा’ची तरतूद; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड| जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक भागांत खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतपूर्व पीक काढणी, पीक मोडणे अथवा नांगरणी करू नये. पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक शेतात ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना व शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करण्यासाठी पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी महत्त्वाची आहे. प्रयोग पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रयोग करण्यात येत आहेत. प्रयोगाची छायाचित्रे व आवश्यक माहिती CCE ॲपवर नोंदविली जात आहे.

दरम्यान, पीक पूर्णपणे वाळून गेले किंवा नष्ट झाले असल्यास ‘शून्य उत्पादन पंचनामा’ (Zero Yield Report) करण्याची तरतूद आहे. त्यामुळे अशा पिकांचीही मुदतपूर्व कापणी न करता संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी.

पीक कापणी प्रयोग अपूर्ण राहिल्यास महसूल मंडळाच्या उत्पादनाची आकडेवारी तसेच पीक विमा भरपाई प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी प्रयोग वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments