Homeनांदेडदुष्काळसदृश्य परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

धरणसाठा, पिण्याचे पाणी आरक्षण व पीक परिस्थितीचा आढावा; पीक कापणी प्रयोग व पंचनामे अचूक करण्याच्या सूचना

नांदेड| जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. धरणातील पाणीसाठा व पिण्याच्या पाण्याचे आरक्षण याचा नियमित आढावा घेऊन टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, धरणांमधील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेताना अनधिकृत पाणी कनेक्शनवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक असून, केवळ धरणातील पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांकडून पेरणी होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

FB IMG 1790863235854 दुष्काळसदृश्य परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पंचनामे वस्तुनिष्ठ करण्याचे निर्देश
दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीचे पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करून वस्तुस्थितीच्या आधारे नोंदी कराव्यात. पंचनाम्याच्या कामात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे कर्डिले यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यातील गरजांचा विचार करून पाणीटंचाईचे नियोजन करावे. टंचाई आराखड्यात आवश्यक उपाययोजनांचा समावेश करून त्या वेळेत पूर्ण कराव्यात. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले. बैठकीत धरणांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे, जलतारा तसेच पाणी उपलब्धता वाढविण्यासाठीच्या विविध उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता इ. म. चिश्ती, कार्यकारी अभियंता प्रवीण थोरात, सी. आर. बनसोड, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. पी. राठोड, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी व शास्त्रज्ञ, जिल्हा नियोजन अधिकारी, कापूस संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यालयी राहून सेवा देण्याचे निर्देश
दुष्काळसदृश्य परिस्थितीत नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व विभागांनी संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सोडवून त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयास द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments