नांदेड। देशातील सर्वात मोठी सभासद नोंदणी असलेल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तिसरे जिल्हा अधिवेशन शहरातील आयएमए भवन येथे दि.२९ डिसेंबर रोजी पार पडले. या वेळी म.गांधी पुतळा येथे गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले.
अधिवेशनाच्या खुल्या सत्रासाठी स्वागत अध्यक्षा म्हणून यशवंत महाविद्यालयाच्या उप प्राचार्या प्रा. डॉ.कविता सोनकांबळे ह्या होत्या.त्यांनी भाषण करून पहिल्या सत्राचे उदघाटन केले. दुसरे सत्र जमसंच्या राज्य अध्यक्षा कॉ.नसीमा शेख आणि महासचिव कॉ.प्राची हातीवलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरले. तेव्हा प्रस्ताविक कॉ. उज्वला पडलवार केले.
प्रमुख पाहुणे म्हणून जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने, शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम,जमसंच्या मराठवाड्याच्या नेत्या प्रा.कॉ.सुनंदा तिडके यांची मार्गदर्शनपर सदिच्छा भाषणे झाली.
कॉ.किशोर पवार, कॉ.डॉ शुभा डाखोरे, कॉ.संगीता गाभने, कॉ.मेघा इंगोले, कॉ.शैलिया आडे,माजी सरपंच कॉ.सुलोचना सिडाम, कॉ.सुशीला पवार आदिजन मंचावर होते. यावेळी संघटनेच्या राज्य अध्यक्षा व महासचिव यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर आपल्या भाषणात जोरदार हल्ला चढवीला.
अनेक भ्रातृभावी संघटणांच्या वतीने अधिवेशनास सदिच्छा देण्यात आल्या.
गांधी पुतळा येथून निघालेली रॅली महापलिका मुख्य प्रवेशद्वारा समोर आल्यावर तेथे काही वेळ थांबून शहरी व पूरग्रस्तांचे थकीत अनुदान व भ्रष्ट कारभाराच्या अनुषंगाने महापालिका विरोधात विविध मागण्याच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
अधिवेशनाच्या रॅलीसाठी जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून ५०० पेक्षा अधिक महिला आल्या होत्या तर दुसऱ्या सत्रात प्रतिनिधी म्हणून २१० महिलांची उपस्थिती होती.या अधिवेशनात अध्यक्षा म्हणून कॉ.लता गायकवाड तर सचिव म्हणून कॉ.सुनीता बोनगीर यांची एकमताने निवड करण्यात आली. जमसंच्या २५ सदस्यीय जिल्हा समिती समिती मध्ये १० महिला पदाधिकारी तर १५ जिल्हा समिती सदस्या आहेत. त्यामध्ये कार्याध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, उपाध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.संगीता गाभने, कॉ. शिलाताई ठाकुर,कॉ.अर्चना काळे सह सचिव कॉ.शैलिया आडे, कॉ. सुलोचना सिडाम, कॉ. प्रयागबाई लोखंडे, कॉ.शिल्पा साबळे,कॉ अरुणा हाटकर तर कोष्याधक्षा म्हणून कॉ.सुंदरबाई वाहुळकर आदींची निवड करण्यात आली.
जिल्हा कमिटी सभासद म्हणून कॉ. वर्षा सांगडे, सारजा कदम,मीना आरसे,कांताबाई बनसोडे, क्रांती सदावर्ते,सविता ढोले,वर्षा वाघमारे, रुख्मिणीबाई होले,दैवशाला सरोदे,कल्पना सरोदे आदींचा समावेश आहे. अधिवेशन यशस्वी करण्यात सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, डिवायएफचे कॉ. जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, पिराजी गायकवाड,कॉ. पंढरी बरुडे, कॉ. गंगाधर खुणे,सीमाताई कोटमाळे, राज सरोदे, कॉ.बबन वाहुळकर आदींनी परिश्रम घेतले.