नायगाव।शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक होण्याची दुर्घटना दिनांक 31/ 12/2024 रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दत्तनगर धनंजय कॉम्प्लेक्स येथे घडली यात मोठं नुकसान झाले आहे.


शहरातील शिवपार्वती कन्स्ट्रक्शनरी अँड जनरल स्टोअर्स किराणा या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. नायगाव येथील नरसी रोड धनंजय कॉम्प्लेक्स शिवपार्वती कन्फेशनरी जनरल स्टोअर्स अँड किराणा हे दुकान लगत असलेले गजानन पा. चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय देखील जळून खाक झाले आहे.

दुकानदार मालकाने काल दिनांक 30 / 12/ 2024 रोजी दुकान रात्रीला 10.30 वाजता दरम्यान बंद करून घरी गेले. घटनेची माहिती दस्तगीर मामू यांनी फोन करून गणेश भाऊराव देगावे व गजानन शंकरराव चव्हाण यांना कळविले की दुकानाला आग लागून धूर निघत आहे. असे कळतात या दोघांनी वेळ अंदाजे पहाटे अडीच ते तीन वाजता नगरपंचायत व पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना कळवून अग्निशामक गाडी बोलावून 31 /12/ 2024 रोजी पहाटे तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत आग वीजवण्यासाठी मोहीम राबविले.

नगरपंचायत व पोलीस प्रशासन सह सर्व सहकाऱ्यांनी व गावातील गावकऱ्यांना सोबत घेऊन अग्निशामकाच्या साह्याने आग वीजवली. त्यात दुकानातील कन्फेशनरी व जनरल स्टोअरचे व किराणा सामान व फर्निचर व कागदपत्र, जीएसटी बिल, पैसे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. या आगीमध्ये अंदाजे 43 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. या घटनास्थळी आमचे तालुका प्रतिनिधी जाय मोक्यावर जाऊन पाहणी केली व सकाळी आठ ते नऊ च्या सुमारास आग ही आकोट्यात आली.
