हिमायतनगर। येथील सहाय्यक निबंधक कार्यलयात कार्यरत असलेले ए.जी. पदमवार, सहकार अधिकारी श्रेणी 2 यांना पदोन्नती होऊन बिलोली येथे नेमणूक देण्यात आली आहे. याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नागोराव माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सहाय्यक निबंधक कार्यालय हिमायतनगर येथे कार्यरत असलेले अधिकारी ए.जी. पदमवार, सहकार अधिकारी श्रेणी 2 यांची नुकतीच पदोन्नती झाली असून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुका येथे सहकार अधिकारी श्रेणी 1 या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिनांक 31 डिसेंबर रोजी 2024 त्यांना कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरचे सचिव नागोराव माने यांनी देखिल पदोन्नती बद्दल श्री पदमवार यांचे अभिनंदन केले. यावेळी सहाय्यक निबंधक ए. एम.गोडसे, जी. जी. मिराशे, सहकार अधिकारी श्रेणी 1, विनोद कोरेवाड, मुख्य लिपीक, कोमल चांदेकर, हिलाल भाई, सचिव बीबी शिंदे, नंदू आलूकाटलेवाड, दिगंबर गायकवाड, बोरगडी, पत्रकार अनिल मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.