Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

नांदेड, लाइफस्टाइल
आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू - एकजण गंभीर हिमायतनगर, प्रतिनिधी | भोकर हिमायतनगर महामार्गावर असलेल्या पोटा आबादी जवळ उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या घटनेत दुचाकी चालक आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील एकजण गंभीर असलेल्या सहा वर्षीय मुलास उपचारासाठी नांदेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका चिमुकल्या बालकांचा अपघातात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले बालाजी गंगाराम नाचारे वय (50) आरूष रतन नाचारे, अक्षय माधव शेळके वय 06 हे तिघेजण दुचाकीवर जात असताना भर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या घटनेत दुचाकीस्वार बालाजी नाचारे व यांचाच नातू आरूष रतन नाचारे हा जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली सदरील हि घटना पोटा अ...
नांदेडमध्ये शिक्षण सेवकांचा कॅण्डल मार्च; मागण्यांकडे वेधले लक्ष

नांदेडमध्ये शिक्षण सेवकांचा कॅण्डल मार्च; मागण्यांकडे वेधले लक्ष

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|  राज्यातील अकाली निधन झालेल्या शिक्षण सेवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण सेवक कृती समिती, नांदेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी महात्मा फुले चौकात कॅण्डल मार्च काढण्यात आला. कॅण्डल मार्चपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी शिक्षण सेवकांनी विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवत शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे काम करूनही सेवा कालावधीत कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शिक्षण सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण किंवा नोकरीची हमी मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मयतांच्या वारसांना नोकरी देऊन आर्थिक मदत करावी, तसेच शिक्षण सेवकांना सर...
डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

डंख छोटा धोका मोठा हिवताप नियंत्रण ही प्रत्येकाची जबाबदारी 

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासुन होतो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्व स्तरावर प्रयत्न केले गेले त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. यादृष्टीने जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात सर्व आरोग्य संस्थेत 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे या वर्षाचे घोषवाक्य Driven to End Malaria : Now We Can.Now We Must मराठी भाषांतर हिवताप...
Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालुक्यात सलग अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सरसम–हिमायतनगर मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला. म्हसोबा नाल्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे मोटरसायकलवरून हिमायतनगरहून सरसमकडे जात होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर व अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या...
Blood Donetion : रक्तदानाची ८२ वी पायरी; दत्ता गायकवाड यांचे माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

Blood Donetion : रक्तदानाची ८२ वी पायरी; दत्ता गायकवाड यांचे माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
नांदेड, अनिल मादसवार| “माणुसकीच्या भिंतीला जेव्हा मदतीचा हात लागतो, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित होतो,” याची प्रचिती नांदेडमध्ये पुन्हा एकदा आली. येथील ‘श्री हजुर साहेब ब्लड सेंटर’मध्ये दत्ता गायकवाड यांनी आयुष्यातील तब्बल ८२ व्या वेळेस रक्तदान करत सेवाभावाचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. थॅलेसेमियाने ग्रस्त असलेल्या चिमुकल्या ऋतुजा गायकवाड या बालिकेला ‘B+’ रक्ताची तातडीची गरज असल्याची माहिती मिळताच, कोणताही विलंब न करता गायकवाड यांनी रक्तपेढीकडे धाव घेतली. त्यांच्या या तात्काळ मदतीमुळे त्या निरागस जीवाला नवसंजीवनी मिळाली. लहान मुलीच्या चेहऱ्यावर परतलेली आशा आणि आनंद पाहून उपस्थितांनाही भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. हे कार्य केवळ वैयक्तिक मर्यादेत न राहता ‘श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप’च्या माध्यमातून व्यापक स्तरावर राबवले जात आहे. थॅलेसेमियाग्रस्त बालकांना नियमित रक्तपुरवठ...
petrol pumps : लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी

petrol pumps : लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. रामनवमीच्या दिवशी दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा, जीप आदी वाहनांनी इंधन भरण्यासाठी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर गर्दी केली होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी पॅनिक खरेदी करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तरीही इंधन तुटवड्याची भीती वाहनधारकांमध्ये दिसून येत असून “टँक फुल” करण्याची स्पर्धाच लागल्याचे चित्र होते. दरम्यान, जानापुरी येथेही गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. गॅस गोडाऊनसमोर नागरिकांनी उन्हातान्हात रांगा लावल्या. प्रत्यक्षात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून, नोंदणीनंतर...
Rajeshwarrao Chintawar passes away : श्री परमेश्वर मंदिराचे माजी सचिव राजेश्वरराव चिंतावार यांचे निधन

Rajeshwarrao Chintawar passes away : श्री परमेश्वर मंदिराचे माजी सचिव राजेश्वरराव चिंतावार यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| श्री परमेश्वर मंदिराचे माजी सचिव तथा संचालक राजेश्वरराव विश्वनाथराव चिंतावार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी गुरुवारी सकाळी ७.३५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. चिंतावार यांनी श्री परमेश्वर मंदिराच्या कार्यात अनेक वर्षे योगदान देत मंदिराच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात मंदिरातील विविध उपक्रमांना चालना मिळाली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी, बोरगडी रोड, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मृत्यू पश्चात, भाऊ, सात मुली, एक मुलगा, सून, नातू, कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा आप्तपरिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली....
Give justice to the elderly : ज्येष्ठांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन – डॉ. हंसराज वैद्य

Give justice to the elderly : ज्येष्ठांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन – डॉ. हंसराज वैद्य

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघ फेडरेशन (फेस्कॉम) उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. ज्येष्ठांच्या मानधनासह विविध मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. डॉ. वैद्य म्हणाले की, विधानमंडळाच्या अधिवेशनात अनेक आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची गंभीरता मांडली आहे. नाशिक येथे झालेल्या ३५व्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक अधिवेशनात सर्वानुमते ठराव मंजूर करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्या वेळी उपस्थित मंत्र्यांनीही सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील ३६ जिल्ह्यांत...
Ganpat Shinde : होमगार्ड गणपत शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

Ganpat Shinde : होमगार्ड गणपत शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू !

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार, सचिन मोरे | कंधार शहरातील राम रहीम नगर येथील रहिवासी व कंधार पोलीस स्टेशन येथे होमगार्ड या पदावर कार्यरत असलेले जवान माधव गणपत शिंदे वय ४९ वर्ष यांचे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत होमगार्ड माधव शिंदे हे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी कंधार पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावून सायंकाळी आपले राहते घरी राम रहीम नगर येथे गेले असता मध्ये रात्रीच्या सुमारास शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मयत माधव शिंदे (होमगार्ड) यांचे पश्चात पत्नी, दोन मुले , आई असा परिवार असून मयत माधव शिंदे हे घरातील कुटुंब प्रमुख होते. मयत शिंदे यांच्यावर दि.२१ मार्च २०२६ रोज शनिवारी दुपारी १२:०० वाजता हिंदू स्मशानभूमी कंधार येथे दुपारी १२:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी...
Himayatnagar’s ‘Jugaad Chul’ : गॅस टंचाईला ‘देशी टेक’ उत्तर ! मोबाईल बॅटरीवर धगधगते हिमायतनगरची ‘जुगाड चूल’

Himayatnagar’s ‘Jugaad Chul’ : गॅस टंचाईला ‘देशी टेक’ उत्तर ! मोबाईल बॅटरीवर धगधगते हिमायतनगरची ‘जुगाड चूल’

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) : गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या लहान हॉटेल व्यवसायिकांसाठी हिमायतनगरातील एका युवकाने भन्नाट आणि किफायतशीर उपाय शोधून काढला आहे. मोबाईल बॅटऱ्यांच्या मदतीने चालणारी ‘जुगाड चूल’ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. बसस्थानक परिसरातील मार्कंडेय टी अँड टिफिन सेंटरचे चालक अमोल बद्दापूरवार यांनी हा अनोखा प्रयोग साकारला आहे. तीन मोबाईल बॅटऱ्यांमधून तयार होणाऱ्या वीजेच्या साहाय्याने डीसी फॅन आणि हेअर सेटिंग मशीन वापरून त्यांनी कोळसा-लाकडाची चूल पेटवण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. या चुलीची खासियत म्हणजे — फक्त स्विच ऑन केला की फॅन चुलीत जोरदार हवा फुंकतो आणि काही क्षणांतच कोळसा लालभडक होतो. त्यामुळे कमी वेळात जास्त उष्णता मिळते आणि स्वयंपाक जलद गतीने पूर्ण होतो. या ‘जुगाड चुली’वर काय होते? चहा बनवणे, तब्बल २० किलो खिचडी शिजवणे, २० लिटर दूध तापवणे, यासह इतर स्वयंप...
error: Content is protected !!