Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kandahar Accident News : कंधार तालुक्यात कार मोटार सायकलच्या अपघातात एक ठार दोन गंभीर

Kandahar Accident News : कंधार तालुक्यात कार मोटार सायकलच्या अपघातात एक ठार दोन गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार (सचिन मोरे) मुलगी पाहायला जाणाऱ्या तीन दुचाकी स्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हि दुर्घटना १७ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास बहादरपुरा ते फुलवळ रोडवरील एमआयडीसीच्या उतारास घडली. या घटनेमुळे कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमएच ३१ सीएस ०७५७ या क्रमांकाची चार चाकी महिंद्रा झायलो कार ही बिदर येथील गुरुद्वाराचे दर्शन करून फुलवळ मार्गे नांदेड कडे जात होती. तर एमएच २६ सीक्यू २९८२ व एमएच २६ सीआर ७६८६ या क्रमांकाच्या दोन दुचाकी गाड्यावरून राजू लक्ष्मण डुबुकवाड वय ४० वर्ष राहणार पानभोसी, विजय संभाजी अमृतवाड वय २५ वर्ष राहणार बावलगाव ता. मुखेड हे एका मोटारसायकलवर तर दुसऱ्या मोटारसायकलवर शुभम नारायण तिगोटे वय २६ वर्ष राहणार रिसनगाव ता. लोहा असे तिघे मिळून मुखेडकडे जात असताना भर...
Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड/भोकर | नवजात बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेबी केअर किट’च्या वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार भोकर तालुक्यात समोर आला आहे. अंगणवाडी केंद्रांमार्फत वितरित करण्यात आलेल्या या किटमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, अपूर्ण वस्तू आणि खराब पॅकिंग असल्याचे उघड झाल्याने लाभार्थी मातांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनेंतर्गत नवजात बालकांसाठी आवश्यक साहित्य देण्यासाठी ‘बेबी किट’ वाटप केले जाते. मात्र भोकर तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये दर्जाहीन कपडे, वापरण्या योग्य नसलेल्या वस्तू आणि काही ठिकाणी अपूर्ण साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही लाभार्थी मातांनी सांगितले की, किटमधील कपडे, टॉवेल, ब्लँकेट यांसारख्या वस्तू अत्यंत हलक...
Tembhi Road Construction : हिमायतनगरच्या अमराई पार्डी पॉईंट पासून ते –टेंभी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण

Tembhi Road Construction : हिमायतनगरच्या अमराई पार्डी पॉईंट पासून ते –टेंभी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातून अमराई पार्डी पॉईंट ते टेंभी गावाकडे जाणाऱ्या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असले तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर टाकून ठेवलेल्या गिट्टी व बांधकाम साहित्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, आज सकाळी प्रवासी घेऊन जाणारे एक ऑटो रस्त्यावर टाकलेल्या खडी व मातीमुळे घसरून खड्ड्यात झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी कोणतीह...
Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या नाली बांधकामाला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार चर्चेत येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने तातडीने भगदाडावर मटेरियल टाकून थातूरमातूर दुरुस्ती करत बोगस कामावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केला आहे. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नालीचे काम गेल्या महिण्यापासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने आतापर्यंत तीन ते चार ठिकाणी नालीला भगदाड पडले असून, अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत....
Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नांदेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card) तहसील कार्यालयात जमा केलेले नाही, त्यांनी ते २५ मार्च २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. ​नेमकी स्थिती काय आहे? नांदेड तालुक्यात एकूण १,२०७ दिव्यांग लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा २,५०० रुपये अनुदान दिले जाते. मात्र, प्रशासकीय नोंदीनुसार यातील ८३३ लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे 'युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड' (UDID) कार्यालयाकडे सुपूर्द केलेले नाही. ​कागदपत्रे कुठे जमा करावीत? प्रशासनाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी 2 पर्याय दिले आहेत: 1.आपल्या गावातील तलाठी यांच्या कडे जमा करावे.2.​ लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालय, संजय गा...
कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये येथील कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा नांदेड येथील सायन्स कॉलेजच्या मैदानावर झाल्या. या स्पर्धेत कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळा नांदेडचा विद्यार्थी बाबू बालाजी डुकरे याने गोळा फेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर शिवाजी नागोराव गाडे हा व्दितीय आणि अमोल रावसाहेब वाघमारे हा तृतीय आला आहे. तसेच १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत याच कार्यशाळेचा विद्यार्थी गट अ मधून महेश विलास जाधव हा दुसरा आणि गट ब मधून परमेश्वर साहेबराव शिलगिरे याने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्याचबरोबर २० जानेवारी रोजी शंक...
Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापिका लताबाई पाध्ये, शिक्षिका माधुरी रेड्डी, वकील स्नेहाताई पार्डीकर, डॉक्टर स्वाती बोंपीलवार, ओम शांती संस्थेच्या सिंधू दीदी, शीतल दीदी, होमगार्ड सोनाली मानपुरे, नागनाथ मंदिराच्या संत देवबाई, अंगणवाडी सेविका सुशीला निम्मेवार, स्वच्छता कर्मचारी वनिता बनसोड, ज्येष्ठ नागरिक सिंधूताई मद्रेवार, श्रीमती सुवर्णा जन्नावार, रुक्मिणा चायल, नगरसेविका सुचिताताई राठोड, स्वामी समर्थ केंद्राच्या उषाताई देशपांडे, हरिपाठ सेविका संगीता साखरकर तसेच समाजसेविका सुनंदा दासेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिल...
Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

नांदेड, लाइफस्टाइल
लोहा | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोहा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व जलचळवळीच्या प्रणेते प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेळेवर लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी यावेळी केले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद धनसडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले. ९ ते १४ वर्षे तसेच १५ ते ४० वर्षे वयोगटातील मुली व महिलांसाठी हे लसीकरण उपयुक्त असल्याची ...
Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’

Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सध्याच्या असंतुलित आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र व जनतेचे संरक्षण व्हावे तसेच येणाऱ्या काळातील आपत्तींपासून सर्वांचे रक्षण व्हावे या उद्देशाने हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सुरु करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यास दिनांक ६ मार्च २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून, ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सेवेत महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या पठण कार्यक्रमात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक ओवी व उवाचला प्रत्यंगिरा मंत्राचा जप करण्यात येत आहे. या सामूहिक प्रार्थनेद्वारे संपूर्ण जगात शांतता व एकोपा निर्माण व्हावा आणि युद्धजन्य परिस्थिती लवकर संपुष्टात य...
Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन महसूल विषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज (दि. ५ मार्च २०२६) नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ) तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वार...
error: Content is protected !!