HomeनांदेडShri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ...

Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सध्याच्या असंतुलित आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र व जनतेचे संरक्षण व्हावे तसेच येणाऱ्या काळातील आपत्तींपासून सर्वांचे रक्षण व्हावे या उद्देशाने हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सुरु करण्यात आले आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यास दिनांक ६ मार्च २०२६ पासून सुरुवात करण्यात आली असून, ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’ सेवेत महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

या पठण कार्यक्रमात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील प्रत्येक ओवी व उवाचला प्रत्यंगिरा मंत्राचा जप करण्यात येत आहे. या सामूहिक प्रार्थनेद्वारे संपूर्ण जगात शांतता व एकोपा निर्माण व्हावा आणि युद्धजन्य परिस्थिती लवकर संपुष्टात यावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.

या उपक्रमात हिमायतनगर शहरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त राष्ट्रकल्याणाच्या सेवेत सहभागी होतं असल्याचे दिसत आहे.

IMG20260307110924 01 Shri pratyangira chandipath : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री प्रत्यंगिरा चंडी पाठ’
oplus_0

यावेळी जप केला जाणारा मंत्र —“ॐ ह्रीं क्ष्रौं भक्ष ज्वालाजिह्वे करालदंष्ट्रे प्रत्यंगिरे क्षं ह्रीं फट् स्वाहा॥” “सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास” या संदेशासह सर्व भक्त या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments