Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर (जि. नांदेड) येथील श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोरड्या रंगांची उधळण करत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. महाशिवरात्री यात्रा उत्सवही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उत्सवात सहकार्य करणारे जवळपास सर्वच नागरिक उपस्थित होते. हलगीच्या तालावर एकमेकांना रंग लावत, पेढे-गाठी भरवून शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली. गावातील युवक व ज्येष्ठांच्या सहकार्याने यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा यावेळी हार व गाठी घालून सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, एकोपा आणि भक्तिभाव जपत सण साजरा केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले....
Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्राण्यांना सणांची समज नसते. त्यांच्यासाठी मोठा आवाज, अचानक अंगावर येणारे रंग, पाण्याचे फुगे आणि आक्रमक वर्तन अत्यंत भीतीदायक आणि जीवघेणे ठरू शकते. रासायनिक रंगांमुळे त्यांची त्वचा आणि डोळे जळू शकतात. नागरिकांनी हा रंगांचा सण साजरा करत असतांना भटके कुत्रे, मांजर, गुरे, पक्षी किंवा पाळीव प्राणी यांना कोणत्याही प्रकारचा ताण, इजा किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. होळी हा आनंद, मैत्री आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे. यंदा हा सण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. भारतीय जीवजन्तु कल्याण बोर्ड (AWBI) च्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांनी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, प्राण्यांना वेदना, दुखापत किंवा त्रास देणे हा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा, 1960 (Prevention of Cruelty to ...
welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल

welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| धुलीवंदन आणि रंगपंचमी सणाचे औचित्य साधत हिमायतनगरातील बाजारपेठ रंगांनी न्हाऊन निघाली आहे. महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि परिसरात विविध रंगांचे स्टॉल, आकर्षक पिचकाऱ्यांची दुकाने आणि गोडधोडाच्या वस्तूंनी बाजार सजला आहे. लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे असे विविध प्रकारचे सुगंधी व हर्बल रंग ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आकाराच्या पिचकाऱ्या, टँकर पिचकारी, गन पिचकारी यांची मोठी मागणी दिसून येत आहे. यासोबतच होळीच्या पारंपरिक पदार्थांसाठी लागणारे खारीक, खोबरे, साखरेच्या गाठी, बत्ताशे आणि पूजेसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहे. यात्रेच्या उत्साहात होळी–रंगपंचमीचा जल्लोष मिसळल्याने संपूर्ण शहरात सणसुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असून व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ...
Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला

Kandhar News : सेल्फी घेण्यासाठी गेला अन जीव गमावून बसला

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार (सचिन मोरे) नांदेड येथून शासकीय काम पूर्ण करून रावणकोळा ता. मुखेड येथे परत जात असताना सेल्फी काढण्याच्या मोहात कनिष्ठ अभियंत्यावर जीव गमवण्याची दुर्दैवी घटना कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीचा पुलावर गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की देगलूर येथील कनिष्ठ अभियंता अविनाश किशन हांडे वय 34 मुळगाव रावणकोळा तालुका मुखेड हे उदगीर येथून त्यांचा मित्र चंद्रकांत दबडे हे दोघेजण मोटरसायकलने शासकीय काम करण्यासाठी नांदेड येथे 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी गेले होते. आपले काम आटोपून कंधार मार्गे रावणकोळा ता. मुखेड येथे परत जात असताना कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर आले असताना फोटो काढण्याचा मोह मयत अविनाश हांडे यांना आवरता आला नाही फोटो काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन पाय घसरून अविनाश हांडे हे नदीत...
Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
माहूर / किनवट| पहाटेचा नियमित व्यायाम एका कुटुंबासाठी काळ ठरला. कोठारी येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. नंदाबाई गोविंदराव पाईकराव असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नंदाबाई पाईकराव या दररोजप्रमाणे सकाळी सुमारे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. कोठारी येथील एमआयडीसी परिसरालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोरून जात असताना सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच Kinwat Police Station चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श...
Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव सर्जे देशमुख व गजानन लक्ष्मण पांचाळ हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना भरधावं कारचालकाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गजानन पांचळ यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शंकरराव सर्जे देशमुख यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने सरसम गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते. या अपघातामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला...
Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात भटक्या व रोगग्रस्त कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांत शाळकरी मुले तसेच काही नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी व सायंकाळी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्यांचा विशेष त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरत असून, त्यांच्यावर नियंत्रणासाठी प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे. खाज, संसर्ग आणि संभाव्य रेबीजचा धोका लक्षात घेता तातडीने आरोग्यविषयक उपाययोजना करणे आव...
Ghagar morcha : वार्ड क्र. १३ मधील महिलांचा नगरपंचायतीवर घागर मोर्चा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची तीव्र झळ

Ghagar morcha : वार्ड क्र. १३ मधील महिलांचा नगरपंचायतीवर घागर मोर्चा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची तीव्र झळ

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक १३ मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी व नागरिकांनी नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. घडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार मागणी करूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत महिलांनी नगरपंचायतीसमोर रिकाम्या घागरींसह आंदोलन केले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो; मात्र पाण्यासाठी दिवसभर फिरावे लागत असल्याने मजुरीचे काम बुडते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन मतदान घेतले गेले; परंतु आता आमच्या ज्वलंत समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. नगराध्यक्ष व नगरसेवक बॅनरबाजी आणि सत्कार समारंभात व्यस्त असून, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वेळ दे...
Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

Wild Boar Attach : पळसा येथे महिलेवर रानडुकराचा हल्ला; महिला गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव (गौतम वाठोरे) हदगाव तालुक्यातील पळसा येथे शेतात काम करत असताना एका महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जनाबाई लक्ष्मीमन वालगोटवाड (वय ५५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. जनाबाई वालगोटवाड या शेतमजुरीचे काम करीत असून त्या आपल्या शेतात तूर कापणी करत असताना अचानक रानडुकराने त्यांच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत रानडुकराला हुसकावून लावत त्यांना वाचवले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती हदगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र घटनेनंतरही अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जखमी महिलेची भेट घ...
Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात. दमट वातावरण बुरशी च्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  भगर खाताना काय काळजी घ्यावी - बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झ...
error: Content is protected !!