Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

Bear Attack Farmers : दयाळ धानोरा शिवारात अस्वलाचा थरार; सात शेतकऱ्यांवर हल्ला, एकाचा मृत्यू

नांदेड, कृषी, लाइफस्टाइल
इस्लापूर| किनवट तालुक्यातील दऱ्याळ धानोरा शिवारात बुधवारी सकाळी भीषण घटना घडली. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अचानक अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात दत्ता जाधव (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. इतर काहींवर किरकोळ उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांसमोर झुडपातून अचानक अस्वल बाहेर आले. काही कळण्याच्या आत त्याने सलग हल्ले केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शिवारात एकच खळबळ उडाली. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. जखमींना तत्काळ किनवट उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. घटनेनंतर वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अस्वलाचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी शिवारात एकट्याने न जा...
Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वस्त, सहज उपलब्ध आणि कोणतीही वैद्यकीय परवानगी नसलेला ‘स्टिक फास्ट’ (चिकट रसायनयुक्त पदार्थ) आज अनेक मुलं व अल्पवयीन तरुणांच्या नशेचा घातक पर्याय बनत चालला आहे. दस्तीवर टाकून किंवा वास घेऊन नशा करण्याचे प्रकार शहरासह ग्रामीण भागात वाढत असून, यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे, ही नशा अतिशय कमी खर्चात मिळत असल्याने शाळकरी वस्तीतील मुलं, कामगार वस्त्या आणि झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. काही मुले थेट सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात किंवा ओसाड जागी दस्तीवर स्टिक फास्ट लावून नशा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोग्यावर गंभीर परिणाम - वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्टिक फास्टमध्ये असलेली रसायने मेंदू, फुफ्फुसे, यकृत व मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतात. चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, श्वास घेण्या...
Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हळहळून गेली आहे. अल्प आजाराने मुलाचा मृत्यू झाल्याचे दुःख सहन न झाल्याने, वडिलांनीही काही तासांत प्राण सोडल्याची घटना घडली असून, बाप–लेकावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली आहे. सिबदरा गावचे रहिवासी गणेश रामलू ताडेवाड (वय 56) यांचे दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्प आजाराने निधन झाले. ग्रामीण भागात मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करणारे गणेश ताडेवाड हे प्रामाणिक, मनमिळावू व कष्टकरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गणेश ताडेवाड यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दुःख व्यक्त केले. ते सध्या हिमायतनगर येथे वास्तव्यास असल्याने दि. ...
Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल!  आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| महावितरणच्या गलथान, बेजबाबदार आणि ग्राहकविरोधी कारभाराचा आणखी एक संतापजनक प्रकार हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे उघडकीस आला आहे. मीटर पूर्णपणे बंद (Faulty) असतानाही एका गरीब महिलेला तब्बल ₹55,300/- चे वीजबिल पाठवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आंदेगाव येथील सविता विश्वनाथ उपलवाड या गरीब महिला ग्राहक असून, त्यांच्या घरातील वीजमीटर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. मात्र असे असतानाही जानेवारी 2026 महिन्यासाठी ₹55,300/- इतके अवाजवी वीजबिल महावितरणने पाठवले आहे. विशेष म्हणजे, बिलावरच “Meter Status : Faulty” असा स्पष्ट उल्लेख असताना इतका प्रचंड वीज वापर दाखवण्यात आल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरत आहे. मीटर बंद असल्यामुळे प्रत्यक्षात कोणताही वीजवापर होत नसताना, मागील रीडिंगच्या अंदाजावर (Average Billing) किंवा पूर्णतः चुकीच्या पद्धतीने बिल ...
Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

नांदेड, आरोग्य, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, रेबीज प्रतिबंधक लसीचा गंभीर तुटवडा असल्याने नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. शहरातील रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर तसेच गल्लीबोळात खरजेने बाधित व विविध आजारांनी ग्रस्त कुत्रे मुक्तपणे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत शहरात आठ ते दहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या नागरिकांना रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, अनेक गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांतून पाच ते सात हजार रुपये खर्च करून लस खरेदी करावी लागत आहे. ...
Ajit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Ajit Pawar : सिडकोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड़|  महाराष्ट्र राज्याचे लाड़के ऊपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अजीत पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे निधन झाल्याचे कळताच सिडको हडकोतील सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली . राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना कळताच सिडको हडको परिसरातील सर्व पक्षीय व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांनी हडको येथे एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली,यावेळी भाजपाचे नगरसेवक संजय पाटील घोगरे, नगरसेवक वैजनाथ देशमुख, शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटिल गिरडे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटिल घोगरे , नगरसेवक प्रतिनिधी सतीश पाटील बस्वदे,राजू लांडगे, साहेबराव मामीलवाड,संभाजी ब्रिग...
Karanji main road poor : हिमायतनगर तालुक्यातील करंजीतील मुख्य रस्ता निकृष्ट; निधीचा खेळ कोणाचा…?

Karanji main road poor : हिमायतनगर तालुक्यातील करंजीतील मुख्य रस्ता निकृष्ट; निधीचा खेळ कोणाचा…?

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर/नांदेड| “रस्ता झाला” असे फलक लागले, पण प्रत्यक्षात करंजीकरांच्या पदरी पुन्हा चिखल, धूळ आणि धोका आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील बसस्थानक ते गावातील मंदिरापर्यंतचा मुख्य रस्ता अवघ्या सहा–सात महिन्यांतच उध्वस्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अर्ध्या भागातील सिमेंट काँक्रेट रस्त्याचा अक्षरशः धुराडा उडाल्याचे चित्र असून, हे निष्कृष्ट काम नेमके कोणाच्या आशीर्वादाने झाले? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. कोटीचा निधी, पण कामाची माती गेल्या अनेक वर्षांपासून करंजी गावाचा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा, ही ग्रामस्थांची जुनी मागणी होती. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात ही बाब गांभीर्याने घेत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला. मात्र, अपेक्षेच्या अगदी उलट चित्र समोर आले आहे. अंदाजपत्रकाला बग...
Devabhau Chashma Seva : सेवाभावातून उजळले हजारो डोळे ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ ठरतेय शहीदी समागमातील जनकल्याणाची ओळख

Devabhau Chashma Seva : सेवाभावातून उजळले हजारो डोळे ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ ठरतेय शहीदी समागमातील जनकल्याणाची ओळख

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडच्या मोदी मैदानावर सुरू असलेल्या भव्य कार्यक्रमात धार्मिकतेसोबतच समाजसेवेचा आदर्श ठेवणारी ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ भाविकांसाठी दिलासादायक ठरत आहे. बदलापूर (जि. ठाणे) येथील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत भाविकांची मोफत नेत्रतपासणी करून गरजूंना मोफत चष्मे वितरित करण्यात येत आहेत. शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घेत आहेत. दिवसभर तपासणी केंद्रावर गर्दी दिसून येत असून, अनेकांना पहिल्यांदाच डोळ्यांची सखोल तपासणी करून घेण्याची संधी मिळत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे चष्मा घेणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे. महिलां व ज्येष्ठ नागरि...
Young man Sucide : हदगाव शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Young man Sucide : हदगाव शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड, लाइफस्टाइल
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात कर्जाच्या ताणामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्दैवी घटना २२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनलगत असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव उमेश जिरवणकर (वय ३३ वर्षे) असे असून, तो हदगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आत्महत्ये मागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने शहरा...
Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक

Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक

आरोग्य, नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान नांदेड जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने आणि जोमाने सुरू असून, या मोहिमेच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांनी नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला. दुर्गम व आदिवासी भागात सुरू असलेल्या तपासणी, सर्वेक्षण आणि जनजागृती कामाची त्यांनी मैदानात उतरून पाहणी केली व आरोग्य यंत्रणेला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. किनवट–माहूर–भोकर ते नांदेडपर्यंत क्षेत्रीय दौरा झाला - या दौऱ्यात डॉ. कानगुले यांनी किनवट, माहूर, भोकर व नांदेड तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना भेटी देऊन अभियानाची अंमलबजावणी तपासली. त्यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तपासणी, सर्वेक्षण आणि जनजागृ...
error: Content is protected !!