Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका
नांदेड आरोग्य लाइफस्टाइल January 30, 2026

Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत
NNL TeamBy NNL TeamJanuary 30, 2026248
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, रेबीज प्रतिबंधक लसीचा गंभीर तुटवडा असल्याने नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. शहरातील रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर तसेच गल्लीबोळात खरजेने बाधित व विविध आजारांनी ग्रस्त कुत्रे मुक्तपणे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांत शहरात आठ ते दहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या नागरिकांना रेबीजची लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, अनेक गोरगरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांतून पाच ते सात हजार रुपये खर्च करून लस खरेदी करावी लागत आहे.

हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सिरंजणी व इतर गावांतील काही रुग्णांना उपचारासाठी नांदेड किंवा थेट विदर्भातील रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती सिरंजणी येथील जागरूक युवा कार्यकर्ता पवन करेवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण, लसीकरण व नसबंदी मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रेबीजसारखा प्राणघातक आजार रोखण्यासाठी आवश्यक लस वेळेत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तालुक्यातील उपआरोग्य रुग्णालयांमध्ये रेबीज लसीच्या तुटवड्याबाबत आरोग्यमंत्री, आरोग्य संचालक आणि नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लसअभावी रुग्णांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी व पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी सिरंजणी येथील सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.

रेबीज हा अत्यंत जीवघेणा आजार असून, वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रेबीज लस उपलब्ध करून द्यावी, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच चावा घेतलेल्या नागरिकांसाठी तात्काळ उपचार व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी हिमायतनगरकर नागरिकांकडून होत आहे. कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

chimukalya jiwala dhokha in Himayatnagar Severe rabies lymph rupture
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAjitdada pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामूळे अभ्यासू व दुरदृष्टीचे नेतृत्व हरपले- डॉ.सुनील कदम
Next Article Cleanliness City : हिमायतनगर शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष स्वतः मैदानात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sand thift : रात्रीला वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे चित्रीकरण पत्रकाराला बेदम मारहाण मोबाईल फोडला

January 18, 2026

Taratirth Dhanegaon Yatra ; आळणी बुवा मठ संस्थान तारातिर्थ धनेगाव यात्रे निमित्ताने भाविक भक्तांची गर्दी

January 30, 2025

Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

June 28, 2025

Ganapati Bappa… Shri Visarjan procession : वाढोणा शहरात सुखकर्ता…दुखहर्त्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप…. टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली श्री विसर्जन मिरवणूक – NNL

September 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

3 thousand 612 cases settled : राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 3 हजार 612 प्रकरणे निकाली ; साडेचौदा कोटीची तडजोड

finally got new buses : उशीरा का..? होईना हदगांव एस टी आगाराला अखेर नवीन बसेस मिळाल्या

District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

CIDCO regional office in Municipal National Lok Adalat ; मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलात मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची ५० लाख वसुली, थकीत २०० मालमत्ता धारक सहभाग – NNL

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?