Homeकृषीदुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून जिल्ह्यातील विविध गावांतील पीक परिस्थितीची पाहणी; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत दिलासा

नांदेड, प्रतिनिधी| पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतीसमोर निर्माण झालेल्या दुष्काळी संकटाची तीव्रता वाढत असताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. “शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल,” असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

पालकमंत्री सावे यांनी शनिवारी हदगाव तालुक्यातील जगापूर व तामसा, भोकर तालुक्यातील हळदा व मोघाळी, उमरी तालुक्यातील सोमठाणा, नायगाव तालुक्यातील पळसगाव तसेच नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी, विशेषतः महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, पावसाची कमतरता आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कर्जमाफीबाबतही दिलासा – दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी चिंता करू नये. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उर्वरित दोन तालुक्यांचाही दुष्काळी यादीत समावेश? – जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही ट्रिगर-२ अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी चर्चा करून अहवाल घेण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

पाहणी दौऱ्यात आमदारांची उपस्थिती – जगापूर व सोमठाणा येथे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, हळदा व मोघाळी येथे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण, पळसगाव येथे आमदार राजेश पवार, तर तुप्पा येथे आमदार आनंदराव तिडके-बोंढारकर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. पीक पाहणीदरम्यान संबंधित गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments