Homeनांदेडश्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक उत्साहात

श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक उत्साहात

टाळ-मृदंगाचा गजर, भारूड-भजनातून भक्तिमय वातावरण; कनकेश्वर तलावाजवळील विहिरीत गणरायाला भक्तिभावाने निरोप

हिमायतनगर, अनिल मादसवार | श्री परमेश्वर मंदिरातील तसेच वडाच्या झाडाखालील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भारूड-भजनीच्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.

मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिला व पुरुष भजनी मंडळांच्या सहभागामुळे मिरवणुकीला पारंपरिक भक्तीमय स्वरूप प्राप्त झाले होते.

IMG20260925133002 scaled श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक उत्साहात
oplus_0

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी प्रसाद व पाण्याचे वाटप करण्यात आले. भक्तिभाव आणि शिस्तबद्ध वातावरणात गणपती बाप्पाला श्री कनकेश्वर तलावाजवळील विहिरीत शांततेत विसर्जित करून निरोप देण्यात आला.

IMG20260925125025 scaled श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक उत्साहात
oplus_0

ही शोभायात्रा श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सचिव अनंता देवकते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक, महिला-पुरुष भजनी मंडळांचे सदस्य, भाविक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

IMG20260925142437 scaled श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीची भव्य पालखी मिरवणूक उत्साहात
oplus_0

मिरवणुकीच्या माध्यमातून परंपरा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments