HomeनांदेडJanmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL

Janmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL

नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाने ऊत्साहात साजरा करण्यात आला असून, यावेळी भव्य मिरवणूक,दहिहंडी भजन कीर्तन,महाप्रसादाने करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम मध्ये २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री ११ ते १२ श्रीकृष्ण जन्मोत्सव महाआरती व महाप्रसाद, व मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी धुपआरती, दहि व लोणीप्रसाद वितरण श्रीद्वारकाधिश, कृष्ण नामजप श्रीमद् भागवतगीता पारायण, येलेराज बाबा जमोदेकर महानुभाव,पालम यांचे किर्तन झाले तर व नंतर गोपालकाला व दहिहंडी व महाआरती झाली दुपारी १ वाजल्या पासून भोजन महाप्रसादने झाली, या सोहळ्याला नंदकिशोर अडकटलवार व यांच्या सह महिला पुरुष भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, हा सोहळया यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक श्रीकृष्ण युवक मंडळ, श्रीकृष्णनगर, संभाजी चौक, सिडको, नांदेड व श्रीकृष्ण मंदिर महानुभाव विश्वस्त मंडळ, राजश्री जामोदेकर, येलेराज बाबा जामोदेकर महानुभाव, पालम यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments