Janmotsav celebrated : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव ऊत्साहात साजरा -NNL
नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाने ऊत्साहात साजरा करण्यात आला असून, यावेळी भव्य मिरवणूक,दहिहंडी भजन कीर्तन,महाप्रसादाने करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम मध्ये २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री ११ ते १२ श्रीकृष्ण जन्मोत्सव महाआरती व महाप्रसाद, व मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी धुपआरती, दहि व लोणीप्रसाद वितरण श्रीद्वारकाधिश, कृष्ण नामजप श्रीमद् भागवतगीता पारायण, येलेराज बाबा जमोदेकर महानुभाव,पालम यांचे किर्तन झाले तर व नंतर गोपालकाला व दहिहंडी व महाआरती झाली दुपारी...
