Wednesday, May 13

लाइफस्टाइल

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Farmar Suffered Losses : बिलोली तालुक्यात शेतातील निवारा जाळण्याची धक्कादायक घटना; शेतकऱ्याचे सुमारे ३ लाखांचे नुकसान

Farmar Suffered Losses : बिलोली तालुक्यात शेतातील निवारा जाळण्याची धक्कादायक घटना; शेतकऱ्याचे सुमारे ३ लाखांचे नुकसान

नांदेड, लाइफस्टाइल
बिलोली, गोविंद मुंडकर | बिलोली तालुक्यातील गागलेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी शेतातील पत्र्याचा निवारा जाळल्याची गंभीर घटना घडली असून, या आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गागलेगाव (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील रहिवासी बालाजी लक्ष्मण आरकटवाड यांच्या शिवारातील गट क्रमांक ११० मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडला दि. ११ जानेवारी २०२६ रोजी अज्ञात कारणाने आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की काही वेळातच संपूर्ण निवारा जळून खाक झाला. या आगीत शेतकामासाठी अत्यावश्यक असलेले साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. यामध्ये जैन कंपनीचे तुपार संच – २, ठिबक सिंचन पाइप (२ एकर), पाण्याची टाकी, वायरचे २० बंडल, ज्वारी – १ क्विंटल, लसूण व कांदे – २ क्विंटल, कोंबडे – ५, पंप, स्प्रे मशीन, चार...
Approach is wrong : डोकेदुखीवर गोळी, तापावर सिरप… पण ठिकाण चुकतंय!

Approach is wrong : डोकेदुखीवर गोळी, तापावर सिरप… पण ठिकाण चुकतंय!

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | हवामानातील अचानक बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी व घसा खवखवणे यांसारख्या आजारांत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र या आजारांवर उपचार करताना अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करून सेवन करत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. ही बाब आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, अशा प्रकारे औषधांचे सेवन जीवावर बेतू शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व अधिकृत औषध विक्रेत्यांशिवाय इतर ठिकाणांहून औषधे घेणे हे मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. चुकीचे औषध, चुकीचा डोस किंवा बनावट औषधे यामुळे आजार बळावण्यासह दुरगामी दुष्परिणाम होण्याचा धोका वाढतो. विशेष म्हणजे, किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा तत्सम आस्थापनांकडून सर्दी, खोकल...
🌟 गजकेसरी योग 2026: कुणाच्या आयुष्यात येणार पैसा, प्रतिष्ठा व आनंदाचा सुवर्णकाळ?

🌟 गजकेसरी योग 2026: कुणाच्या आयुष्यात येणार पैसा, प्रतिष्ठा व आनंदाचा सुवर्णकाळ?

नांदेड, लाइफस्टाइल
वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेसरी योग हा अत्यंत शुभ, प्रभावी व दुर्मिळ योग मानला जातो. गुरु (ज्ञान, संपत्ती, विस्तार) आणि चंद्र (मन, लोकप्रियता, सुख) यांच्या केंद्रस्थानी होणाऱ्या संयोगामुळे हा योग निर्माण होतो. हा योग राजयोगाच्या तोडीसतोड मानला जातो. फल: धनलाभ, मान-सन्मान, पदोन्नती, व्यवसायवृद्धी, मानसिक समाधान, कुटुंबसुख. 🔱 गजकेसरी योग कुणासाठी ठरणार भाग्यवर्धक? (राशीनुसार सविस्तर माहिती जाणून घेऊया) ♈ मेष ✔️ अडकलेले पैसे मिळणार ✔️ नोकरीत जबाबदारी व अधिकार वाढतील ✔️ जमिनी–घराचे योग 👉 आर्थिक स्थैर्याची सुरुवात ♉ वृषभ ✔️ व्यवसायात मोठा करार ✔️ कौटुंबिक सुखात वाढ ✔️ जुनी गुंतवणूक फळ देईल 👉 पैशाचा ओघ वाढणार ♊ मिथुन ✔️ नोकरीत पदोन्नती ✔️ स्पर्धा परीक्षेत यश ✔️ मान-सन्मानात वाढ 👉 बुद्धिमत्तेला सुवर्णफळ ♋ कर्क ✔️ अचानक धनलाभ ✔️ मानसिक तणावातून मुक्ती ✔️ कुटुंबात शुभकार्य ...
Passed away : कलंबर बु. येथे शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Passed away : कलंबर बु. येथे शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर | लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कलंबर बु. येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याचे नाव गंगाधर गणेश मैलारे (वय ५१) असे असून, ते दररोजप्रमाणे आपल्या शेतातील गहू व हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप (मोटार) सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले होते. यावेळी विहिरीच्या कडेला चालत असताना पाय घसरून तोल गेल्याने ते थेट विहिरीतील पाण्यात पडले. ही घटना सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. सध्या महावितरणकडून अचानक बदलत्या वेळेत विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना कधी सकाळी तर कधी दुपारी पाणी द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी झोपेतून उठून घाईघाईने शेतात जात असल्याचे चि...
Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर/नांदेड | पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे आजारपणामुळे आज सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पद्मशाली समाजासह नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार हे समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सामाजिक कार्यातून अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक अनुभवी व मार्गदर्शक व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता बोरगडी रोड, वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा सामाजिक परिवार आहे. ते पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष संजय परमेश्वर मादसवार यांचे वडील होते.🙏 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे ॐ शांती....
Passed away : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख हमीद यांचे निधन

Passed away : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख हमीद यांचे निधन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख हमीद यांचे अल्प आजाराने आज दि.16 जानेवारी 2026 रोजी पहाटे निधन झाले. मृत्यू समयी ते 63 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेड पोलीस दलातील मोटार परिवहन विभागात त्यांनी चालक म्हणून काम केले होते.व्हीव्हीआयपी साठी राखीव असलेल्या कारचे ते चालत होते. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचे वाहन चालक म्हणून त्यांनी काम केले होते.अनेक पत्रकारांशी हमीद यांची अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या पार्थिवाचा दफन विधी शिवाजीनगर जवळील नई आबादी येथील मशिदी लगतच्या स्मशानभूमीत करण्यात येणार आहे....
The door that awaits… वाट बघणारं दार….

The door that awaits… वाट बघणारं दार….

नांदेड, लाइफस्टाइल, लेख
आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब आहे. आपण  नुकतेच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सन 2025 ची आकडेवारी समोर आली आहे या नुसार देशात वर्षभरात 9 लाख 72 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला आहे. सरासरीचा विचार करता दिवसाला साधारण 471 जण या अपघातात प्राणास मुकले आहेत. महिन्याला 14 हजारांहून अधिक (14130) अपघातात मरण पावले आहेत. अपघात वाढले याचे मुख्य कारण अर्थात गतीचे वेड असणारी नवी पिढी होय. होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. शासन विविध स्तरावर जनजागृती आणि सुरक्षा उपाय करीत आहे. त्यानंतरही हे अपघात होत आहेत. अपघातात प्राण गमावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या उत्...
Gangadhar Patane : गंगाधरराव म्हाळप्पा पटणे : एक पत्रकार, कर्तृत्ववान राजकीय व सामाजिक नेतृत्व

Gangadhar Patane : गंगाधरराव म्हाळप्पा पटणे : एक पत्रकार, कर्तृत्ववान राजकीय व सामाजिक नेतृत्व

नांदेड, लाइफस्टाइल, लेख
बिलोली तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक जीवनात दीर्घकाळ प्रभावी योगदान देणारे समाजवादी विचार- सरणीचे ज्येष्ठ नेते, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी गंगाधरराव म्हाळप्पा पटणे यांचे अश्विनी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बिलोली तालुक्याने केवळ एक माजी लोकप्रतिनिधी नाही, तर निर्भीड विचारांचा, तत्त्वनिष्ठ आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळवून ठेवणारा एक संवेदनशील नेतृत्वकर्ता गमावला आहे. गंगाधरराव पटणे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी दैनिक मराठवाडा या वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्य केले. त्याचप्रमाणे दैनिक प्रजावाणीमध्ये त्यांचे विचारप्रधान लिखाण नियमितपणे प्रकाशित होत असे. शब्दांमधून सत्य मांडण्याची, अन्यायावर बोट ठेवण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची त्यांची...
Kiran Khandare Passed away : दारूबंदी विभागातील पोलीस कॉनस्टेबल किरण खंदारे यांचे दुःखद निधन

Kiran Khandare Passed away : दारूबंदी विभागातील पोलीस कॉनस्टेबल किरण खंदारे यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट (प्रतिनिधी) तालुक्यातील माळकोल्हारी येथील रहिवासी कै. किरण मारोती खंदारे (वय २८) यांचे आज शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता किनवट येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. कै. किरण खंदारे हे गेल्या पाच वर्षांपासून दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते हदगाव येथे आपली सेवा बजावत होते. कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मौजे माळकोल्हारी, ता. किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर त्यांनी दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त ...
Blood camp : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद :  महिला–पुरुष रक्तदात्यांचा मोठा सहभाग

Blood camp : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : महिला–पुरुष रक्तदात्यांचा मोठा सहभाग

नांदेड, आरोग्य, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या “जीवनदान महाकुंभ २०२६” अंतर्गत बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शहर व ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत–सत्कार करण्यात आला तसेच शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. हे शिबिर तालुका सत्संग समिती व तालुका सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरु नरेंद्राचा...
error: Content is protected !!