HomeनांदेडKiran Khandare Passed away : दारूबंदी विभागातील पोलीस कॉनस्टेबल किरण खंदारे यांचे...

Kiran Khandare Passed away : दारूबंदी विभागातील पोलीस कॉनस्टेबल किरण खंदारे यांचे दुःखद निधन

किनवट (प्रतिनिधी) तालुक्यातील माळकोल्हारी येथील रहिवासी कै. किरण मारोती खंदारे (वय २८) यांचे आज शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता किनवट येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

कै. किरण खंदारे हे गेल्या पाच वर्षांपासून दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते हदगाव येथे आपली सेवा बजावत होते. कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मौजे माळकोल्हारी, ता. किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर त्यांनी दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments