HomeनांदेडShri Balaji Charitable Trust ; श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास...

Shri Balaji Charitable Trust ; श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा 15 वा दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम

नवीन नांदेड l श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा वतीने 15 व्या ब्रम्होत्सव निमित्ताने 22सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्सव सेवा,भजन संध्या, बालाजी पालखी परिक्रमा,यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले असून 28 सप्टेंबर रोजी समर्थ किल्लनिक यांच्या तर्फे वैद्यकिय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,विजया दशमी निमित्ताने 02 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान बालाजी मंदिरात ब्रम्होत्सव निमित्ताने 22ते 2ऑक्टोंबर 25 दरम्यान
श्री गणेश पुजा, अभिषेक ध्वजाहोरण,होम हवन, आरती विष्णु सहस्त्र नाम, कुमकुमअर्चना आदी नित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन पालखी उत्सव परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.

मार्कण्डेय भजनी मंडळ रात्री 8ते 10, तर 26 रोजी श्री नृसिंह मंडळ बसवेश्वर नगर,26रोजी नंदीग्राम संगीत सभा,नंदी पासून स्वरभकती ,29 रोजी संत तुकाराम भजनीं मंडळी सौनखेड, हभप मोरे महाराज यांच्ये किर्तन होणार आहे.

बालाजी परिक्रमा 22 सप्टेबंर ते 1 ऑक्टोबर सायंकाळी 5ते 7 दरम्यान तर श्री भगवान बालाजीच्या मुख्य रथ विजया दशमीचा दिवशी दुपारी 3 वाजता मंदीरा पासून मुख्य मार्गावर निघुन जुना कौठा विठ्ठल मंदिर कडुन परत बालाजी मंदिर कडे येईल तर सायंकाळी 7 ,30 वाजता रावण दहन करण्यात येईल. ब्रम्होत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्या पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष विजयकुमार पवार, कार्याध्यक्ष उद्धव बसवंंदे,उत्तमराव भाले, बाबाराव ईबितवार, डॉ.देवदत देशपांडे, गंगाधर बडवणे,ॲड.गणेश किर्तने, उत्तमराव वरपडे,साईप्रसाद वरपडे, व पदाधिकारी यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments