Thursday, May 21

Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

नांदेड/भोकर | नवजात बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेबी केअर किट’च्या वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार भोकर तालुक्यात समोर आला आहे. अंगणवाडी केंद्रांमार्फत वितरित करण्यात आलेल्या या किटमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, अपूर्ण वस्तू आणि खराब पॅकिंग असल्याचे उघड झाल्याने लाभार्थी मातांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाच्या योजनेंतर्गत नवजात बालकांसाठी आवश्यक साहित्य देण्यासाठी ‘बेबी किट’ वाटप केले जाते. मात्र भोकर तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये दर्जाहीन कपडे, वापरण्या योग्य नसलेल्या वस्तू आणि काही ठिकाणी अपूर्ण साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही लाभार्थी मातांनी सांगितले की, किटमधील कपडे, टॉवेल, ब्लँकेट यांसारख्या वस्तू अत्यंत हलक्या दर्जाच्या असून काही वस्तू वापरण्यायोग्यही नाहीत. काही ठिकाणी किटमधील साहित्य ओलसर अवस्थेत असल्याचेही दिसून आले. परिणामी लाभार्थी मातांनी नाराजी व्यक्त करत नव्या आणि दर्जेदार किट देण्याची मागणी केली आहे.

FB IMG 1773672461524 Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून आलेल्या किटमध्येच काही वस्तू कमी असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप या समस्येवर ठोस तोडगा निघालेला नाही.

FB IMG 1773672471656 Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

दरम्यान, या प्रकारामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून निकृष्ट साहित्य पुरवणाऱ्या संबंधित पुरवठादारांवर कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी माता आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

याबाबत महिला व बालविकास विभागाने तातडीने लक्ष घालून दोषींची चौकशी करावी आणि लाभार्थींना दर्जेदार ‘बेबी किट’ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!