नांदेड। नांदेड जिल्हा शिवाजीनगर पोलीसांनी ६१ लक्ष २०,०००/- रुपयाचा राशनचा गहु, तांदुळ पाच वाहनासह जप्त केला आहे, या कार्यवाहीचे पोलीस अधीक्षक व सर्व वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबिनाश कुमार साहेब, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदया नुसार कार्यवाही करणे बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांना प्राप्त बातमी अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत नविन मोंढा नांदेड या ठिकाणी पाच वाहणे थांबलेली असुन सदर वाहणामध्ये संशयीत राशन चा गहु, तांदुळ असले बाबत ची माहिती मिळाली.
यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील अधिकारी व कर्मचारी लागलीच जावुन बातमी प्रमाणे मराठा गर्ल्स हॉस्टेल जवळ नविन मोंढा नांदेड येथे तपासणी केली असता एक महिंद्रा वाहण क्रमांक एम.एच २६ सी.एच ९२९७ मध्ये तांदुळ एकुण ६५० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकुण ६,५०,०००/- रुपये व गाडी ची किमंत अंदाजे – २०,००,०००/- रुपये असा एकुण २६,५०,०००/-रुपये, एक आयचर वाहण क्रमांक एम. एच २६ एच ८०७३ मध्ये तांदुळ एकुण १२० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकुण १,२०,०००/- रुपये व गाडी ची किमंत अंदाजे – १०,००,०००/- रुपये असा एकुण ११,२०,०००/-रुपये
एक ट्रक टाटा २५१५ वाहण क्रमांक एम. एच २६ ए.डी. १४५८ मध्ये तांदुळ एकुण १३० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकुण १,३०,०००/- रुपये व गाडी ची किमंत अंदाजे १५,००,०००/-रुपये असा एकुण १६,३०,०००/-रुपये, एक अशोक लेलँड वाहण क्रमांक एम.एच २६ ए.डी. ८०९६ मध्ये तांदुळ एकुण ६० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकुण ६०,०००/- रुपये व गाडी ची किमंत अंदाजे ३,००,०००/- रुपये असा एकुण ३,६०,०००/-रुपये
०५.. एक अशोक लेलैंड बडा दोस्त मध्ये वाहण क्रमांक एम.एच ४७ ए.एस.१७७१ मध्ये तांदुळ एकुण ६० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किमंती अंदाजे १००० रुपये असे एकुण ६०,०००/- रुपये व गाडी ची किमंत अंदाजे ३,००,०००/- रुपये असा एकुण ३,६०,०००/-रुपये असा एकुण ६१,२०,०००/- रुपयाचा संशयित माल मिळुन आल्याने पाच वाहणे ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे लावण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागाचा अहवाल मागुन पुढील कार्यावाही करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, किरतिका मॅडम सहा. पोलीस अधिक्षक नांदेड, उपविभाग नांदेड शहर, सुशील नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जे.ए. तांदळे पोलीस निरीक्षक, स.पो.नि. रामेश्वर तुरनर, पो.उप.नि.गांवडे, पो.हे.कॉ.१००७ झांबरे, पो.कॉ. ३०९९ सिंगल, पो.कॉ. ३१४७ वडजे, पो.कॉ. २०२६ गफार, पो.कॉ. ३०७४ पाटील, पो.कॉ. २८७१ गिनेवाड, पोकॉ. ११४९ स्वामी म.पो.कॉ.७३ जानगेवाड यांनी पार पाडली.