नांदेड| शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा राहुल गांधी यांच्या कडे माजी उपहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी काल नांदेड भेटी दरम्यान केले.
विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांचे काल सोमवारी नांदेड च्या श्री गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांची काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, खा रवींद्र चव्हाण, खा.वर्षा गायकवाड,जिल्हाध्यक्ष बी आर कदम, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगवकर, शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या सह काँगेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान खा राहुल गांधी यांची स्थानिक कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट घेतली. यावेळी माजी उपहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी भेटीत शेतकरी व बेरोजगार तरुणां च्या प्रश्नाकडे खा राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी तसेच महाराष्ट्रात तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन केले.