श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगड हे साडेतीन शक्तीपीठा पैकी एक मुळ पीठ असून या ठिकाणी श्री रेणुका माता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री अनुसया माता मंदिर तसेच वनदेव, कैलास टेकडी यासह अनेक देवस्थाने आहेत. ह्या सर्व मंदिर देवस्थानाला जाणारा मार्ग हा जंगलव्यप्त असलेल्या भागातून जातो. सदरील भाग हा जंगल भाग असल्याने येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रोही, हरण तसेच महाकाय सरपटणारे प्राणी अनेकांना आढळत असतात.
दि २३ डिसे. रोजी रात्री ९:३० वाजता श्री रेणुका माता मंदिरावर असलेल्या व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणने बंद करून दुचाकी वाहणाने घरी परतत असताना त्यांना रस्त्यात भला मोठा विशाल अजगर रस्ता ओलांडाताना दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. दोन्ही बाजूने अनेक वाहने अजगर सापाला पाहून रस्त्यात बराच वेळ थांबून होती. वाहनांचा उजेड आणि आवाजामुळे अजगराने रस्त्याच्या कडेने जावून जंगलाची वाट धरली तर अजगर गेल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडत आपआपली वाट धरल्याची घटना घडली आहे.
माहूर शहरासह तालुक्याला संपूर्णपणे जंगलाने वेढलेले असून येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय असून अडचण नसून खोंळंबा सदरात जमा आहे. येथे अनेक वेळा अभयारण्यातून वाघ, बिबटे, अस्वल येऊन धुमाकूळ घालत असतात त्यांच्या हल्ल्यात नागरिकांसह पाळीव जनावरांचा जीव गेलेला आहे. माहूर शहरातही तहसील कार्यालय, देवदेवेश्वर मंदिर, मातृतीर्थ कुंड इतर स्थळावर अनेक वेळा नागरिकांना बिबट्या, अस्वल व वाघाचे दर्शन झालेले आहेत. परंतु वनविभाग याकडे हेतू पुरस्पंर दुर्लक्ष करीत असते, अनेक वेळा या बाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित झाले, अनेक नागरिकांनी निवेदन दिले. परंतु ‘दिन जाओ, पगार आओ’ अशा मनस्थितीत काम करत असलेल्या अधिकार्याला अद्याप जाग आलेली दिसत नाही.त्यामुळे गेंड्याची कातडी घालून सुस्त बसलेल्या अधिकार्याच्या गळ्यात कोण घंटी बांधेल ? याकडे पाळीव प्राण्यावर हल्ला करुण व शेतातील पीक फस्त झालेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दि.२३ डिसे.रोजी नेहमी प्रमाणे अनेक भाविक राञी गडावर दर्शनासाठी गेले होते तर अनेक भाविक शहरातून वर दर्शनासाठी जात होते,अशातच घाटातील गाय मुखाजवळ भलामोठा महाकाय वीस फूट लांबीचा अजगर रस्त्यावर आडवा पडलेला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहने थांबून वाहनधारकांनी जोरात हॉर्न वाजविल्याने अजगराने रस्त्याच्या कडेला जाऊन जंगलात प्रवेश केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी अनेक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकार्याला व कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून कल्पना देण्याचा प्रयत्न केला परंतु एकाचाही प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर याबद्दल नाराजी व्यक्त केली.