A twenty-foot python : माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वीस फुटाचा अजगर ; वाहनधारकात भितीचे वातावरण -NNL
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगड हे साडेतीन शक्तीपीठा पैकी एक मुळ पीठ असून या ठिकाणी श्री रेणुका माता मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री अनुसया माता मंदिर तसेच वनदेव, कैलास टेकडी यासह अनेक देवस्थाने आहेत. ह्या सर्व मंदिर देवस्थानाला जाणारा मार्ग हा जंगलव्यप्त असलेल्या भागातून जातो. सदरील भाग हा जंगल भाग असल्याने येथे वाघ, बिबट्या, अस्वल, रोही, हरण तसेच महाकाय सरपटणारे प्राणी अनेकांना आढळत असतात.
दि २३ डिसे. रोजी रात्री ९:३० वाजता श्री रेणुका माता मंदिरावर असलेल्या व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणने बंद करून दुचाकी वाहणाने घरी परतत असताना त्यांना रस्त्यात भला मोठा विशाल अजगर रस्ता ओलांडाताना दिसल्याने त्यांची पाचावर धारण बसली. दोन्ही बाजूने अनेक वाहने अजगर सापाला पाहून रस्त्यात बराच वेळ थांबून होती. वाहनांचा उजेड आणि आवाजामुळे अजगराने रस्त्याच्या कडेने जावून जंगलाची वाट धरली तर अजगर ग...
