Homeनांदेडहदगाव-माहूरमध्ये जिल्हाधिकारी-सीईओंचा संयुक्त दौरा शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व विकासकामांची पाहणी

हदगाव-माहूरमध्ये जिल्हाधिकारी-सीईओंचा संयुक्त दौरा शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व विकासकामांची पाहणी

दुष्काळी उपाययोजनांचा आढावा

नांदेड | जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी हदगाव व माहूर तालुक्याचा संयुक्त दौरा करून विविध शासकीय कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य शिबिर तसेच पीक कापणी प्रयोगांचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हदगाव तालुक्यातील पळसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली असता रजेचा अर्ज उपलब्ध नसताना तीन शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. शाळा, वर्गखोल्या व अंगणवाडी परिसरात स्वच्छता राखण्याचे निर्देशही देण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेण्यात आली. अंगणवाडीतील बालकांचे वेळेत वजन घेऊन त्यांना सकस आहार मिळतो की नाही, याचीही पाहणी करण्यात आली.

माहूर तालुक्यातील मालवाडा येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत शेतीसमोरील अडचणी जाणून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा कामाचा शुभारंभ करण्यात आला. पाण्याचे संवर्धन व जलसाठ्यात वाढ करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

FB IMG 1791376831249 हदगाव-माहूरमध्ये जिल्हाधिकारी-सीईओंचा संयुक्त दौरा शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व विकासकामांची पाहणी

लखमापूर येथे आरोग्य तपासणी शिबिराची पाहणी करून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. नियमित आरोग्य तपासणीसोबत हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी योग्य आहार व आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. लखमापूर ग्रामपंचायतीत ग्रामस्थांशी संवाद साधताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी संवर्धन, जलसंधारण व रोजगारनिर्मितीसाठी सुरू असलेल्या मनरेगा कामांचा आढावा घेण्यात आला.

लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेण्यात आली. यावेळी पालकांशी संवाद साधून शाळेतील शैक्षणिक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेणुका माता देवस्थानाची पाहणी करण्यात आली. भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधांसाठी संबंधित विभागांनी केलेल्या तयारीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यानंतर माहूर पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. मनरेगाअंतर्गत रोजगारनिर्मिती, जलसंधारण, पाणी संवर्धन, शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी, दुष्काळी उपाययोजना, कर्जविषयक अडचणी, बँकांशी संबंधित प्रश्न तसेच बचत गटांच्या कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीत जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य यांना प्राधान्य द्यावे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments