Homeनांदेडघर बदलण्याच्या बहाण्याने ₹8.12 लाखांवर डल्ला; इतवारा पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या, शंभर...

घर बदलण्याच्या बहाण्याने ₹8.12 लाखांवर डल्ला; इतवारा पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या, शंभर टक्के मुद्देमाल जप्त

नांदेड, प्रतिनिधी | नांदेड शहरातील मदिना नगर परिसरात घरातील सामान स्थलांतरित करण्याच्या गोंधळाचा फायदा घेत तब्बल ₹8.12 लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीचा इतवारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीतील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी शेख शहबाज शेख जाफर (वय 40, रा. नौमानिया कॉलनी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 24 जुलै 2026 रोजी सकाळी मदिना नगर येथील भाड्याच्या घरातून सामान दुसरीकडे हलवित असताना आरोपींनी संगनमत करून त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील तसेच अपघात विम्याच्या रकमेतील ₹8 लाख 12 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 261/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि इतर तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पिराजी बाळू वाघमारे, सुनील बाबुराव रॅपनवाड, सुनील चिमनाजी वाघमारे, साहेबराव पिराजी वाघमारे आणि तनुष्क गणपत मेटकर या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीतील ₹8.12 लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केले असता सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आगलावे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. घर बदलताना झालेल्या चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या इतवारा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments