Homeधार्मिकश्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता

श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता

तीर्थदर्शन करून परतलेल्या ५० भाग्यवान भाविकांचे श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे भव्य स्वागत; माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे आहेराची भेट

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट, वाढोणा यांच्या वतीने श्रावण महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या कथा सेवेतून लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या ५० भाग्यवान भाविकांना अयोध्या, काशी, उज्जैन, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ आदी पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाची संधी मिळाली. विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत ही यात्रा पूर्ण करून बुधवार दिनांक 07 ऑकटोबर रोजी भाविक सुखरूप हिमायतनगर येथे परतले. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळेच्या विद्यार्थिनींच्या पथकाने वादयाच्या निनादात यात्रेकरूं भाविकांचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
IMG20261007093905 01 श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता
oplus_0
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी, काशी विश्वनाथासह विविध पवित्र स्थळांचे दर्शन घेतल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव ओसंडून वाहत होता. या अविस्मरणीय तीर्थयात्रेचा अनुभव भाविकांनी यावेळी व्यक्त केला. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टने भाविकांना दिलेली ही धार्मिक यात्रेची संधी अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
IMG20261007093438 01 श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता
oplus_0

यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्यातर्फे यात्रेत सहभागी झालेल्या सर्व ५० भाविकांना आहेराची भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नेहाताई कवळे पाटील यांच्यातर्फे प्रत्येक भाविकाला गुळपावडरचे पाकीट देऊन सत्कार करण्यात आला. मंदिर ट्रस्टच्या वतीने महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भाविकांचे स्वागत केले. श्री परमेश्वराच्या कृपेने संपूर्ण यात्रा निर्विघ्न आणि सुखरूप पार पडल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

IMG20261007100632 01 श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता
oplus_0

यावेळी नगराध्यक्ष शेख रफिक सेठ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, सभापती जनार्धन ताडेवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सौ सुचिता आदेश श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक सो लताबाई मुंलंगे , श्रीमती मथुराबाई भोयर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, जेष्ठ नागरिक श्री अक्कलवाड सर, रामराव सूर्यवंशी, नगरसेवक डॉ राजेंद्र वानखेडे, डॉ. प्रकाश वानखेडे, भास्कर चिंतावार, वऱ्हाडे सर, बाळू अण्णा चवरे, गोविंद बंडेवार, तुकाराम मेरगेवाड, प्रवीण कोमावार, अशोक सिंगणवाड, राम नरवाडे, श्याम जक्कलवाड, बाळू मेंडके, योगेश चिलकावार, साहेबराव चव्हाण, पापा पार्डीकर, गंगाधर बासेवाड, मोतेवार सर, रायेवार सर, अरेपल्लू काका, मारोती हेंद्रे, चव्हाण काका, यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्व संचालक , सेवेकरी कर्मचारी, दर्शनार्थी महिला पुरुष भाविक तसेच यात्रेकरूंचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या या उपक्रमामुळे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोपा यांना चालना मिळत असून, ‘श्री परमेश्वराच्या चरणी भक्ती आणि तीर्थदर्शनातून आध्यात्मिक समाधान’ असा भाव या यात्रेतून अनुभवायला मिळाला.

IMG20261007093509 01 श्री परमेश्वराच्या कृपाछायेत अयोध्या-काशी यात्रेची भक्तिमय सांगता
oplus_0
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments